Coronavirus Updates: नवी मुंबईत COVID19 च्या आणखी 617 रुग्णांची भर
तर नवी मुंबईत गेल्या 24 तासात आणखी 617 कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. तर जुलै 14 रोजी नवी मुंबईत 500 पेक्षा कमी रुग्ण आढळून आले होते.
नवी मुंबईत (Navi Mumbai) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. तर नवी मुंबईत गेल्या 24 तासात आणखी 617 कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. तर जुलै 14 रोजी नवी मुंबईत 500 पेक्षा कमी रुग्ण आढळून आले होते. तर नेरुळ येथे आणखी 94 कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली आहे. तर तुर्भे येथे सर्वाधिक मृत्यूदर असून तो 9.09 टक्क्यांवर पोहचला आहे. तर वाशी आणि एपीएमसी येथे अनुक्रमे 916 आणि 479 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
तर रबाळे येथे 2,600, पनवेल मध्ये 1154 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत नवी मुंबईत 5674 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकूण आकडा 16,467 वर पोहचला आहे. त्याचसोबत 10,332 जणांची प्रकृती सुधारली आहे. बुधवारी 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण आकडा 461 वर पोहचला आहे. नवी मुंबईत मृत्यूदर 2.79 टक्के आहे. (Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स)
तसेच मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास बोरिवली, दहिसर, कांदिवली आणि मालाड येथे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य) सुरेश काकानी यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणच्या इमारतींवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.मुंबई महापालिकेचे कर्मचारी विविध इमारती मधील संस्थापकांसोबत मिटिंग करत आहेत. त्यानुसार कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण कसे मिळवावे या मुद्द्यांबाबत त्यांना समजावून सांगत आहेत. ताप क्लिनिकची स्थापना करुन तेथे अँटीजेन चाचण्या करण्यात येतील. त्याचसोबत स्थानिकांची ऑक्सिजनची पातळी तपासणे हे मोठे काम आहे. सोसायट्यांना मार्गदर्शक सुचना ही दिल्या जाणार असून काय करावे आणि काय करु नये याबाबत व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमातून सांगितले जाणार असल्याचे ही महापालिकेसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Coronavirus Cases In Dharavi: धारावीत आज 23 नवे कोरोनाबाधित रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या 2415 पोहचली)
दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून काल (15 जुलै) 233 मृत्यू आणि 7,975 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 2,75,640 वर पोहोचली आहे. आज राज्यात 3,606 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत तब्बल 1,52,613 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई (Mumbai) शहरात आहेत. मुंबईमधील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 96,253 वर पोहोचली आहे.