COVID-19 Death in Mumbai: मुंबई मध्ये 78 दिवसांनंतर पुन्हा कोविड 19 ने दगावला रूग्ण; Comorbidities असल्याची रूग्णालयाची माहिती

मागील 36 दिवसांत 30 जण कोविड 19 मुळे दगावले आहेत.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) मध्ये तब्बल 78 दिवसांनंतर कोविड 19 मुळे मृत्यू (COVID-19 Death in Mumbai) झाल्याची घटना समोर आली आहे. सध्या मुंबई शहरातील सक्रिय कोविड 19 रूग्णांचा आकडा 1244 वर पोहचला आहे. बीएमसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एका 69 वर्षीय व्यक्तीचा कोविड 19 मुळे मृत्यू झाला आहे. त्यांना hypertension आणि hypothyroidism च्या समस्या होत्या. तो चेंबूर भागातील रहिवासी होता. हॉस्पिटलमध्ये दाखल होताच 24 तासामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. BMC executive health officer Dr Mangala Gomare यांनी रूग्णाला हायपरटेंशन आणि हृद्यविकाराचा जुना त्रास असल्याचं म्हटलं आहे.

जानेवारी 17 दिवशी 68 वर्षीय एका व्यक्तीचा कोविड मुळे मृत्यू झाला आहे. त्याला किडनी फेल्युअरचा त्रास होता. मार्च 2020 ला कोविड 19 चं संकट सुरू झाल्यापासून आतापर्यंत मुंबई मध्ये 1.5 लाख मृत्यू झाले आहेत.

कोविड 19 चे राज्यातील रूग्ण वाढत आहेत. मागील 36 दिवसांत 30 जण कोविड 19 मुळे दगावले आहेत. मुंबईत सध्या 1244 रूग्ण उपचार घेत आहेत. 80 जण हॉस्पिटलमध्ये आहेत तर त्यापैकी 50% जण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. नक्की वाचा: Mask Mandatory in Satara: सातारामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्तीचा. 

Dr Gomare यांनी बीएमसी राज्य आणि केंद्राची गाईडलाईन फॉलो करत असल्याची म्हणाले आहेत. RTPCR positive samples, enome sequencing साठी पाठवले जात आहेत. तसेच कोविड पॉझिटीव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांची देखील तपासणी होत आहे.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 13-14 एप्रिल दिवशी राज्यात मॉक ड्रिल केले जाणार असल्याचे सांगितले आहे. हा निर्णय राज्यात वाढत असलेल्या कोविड 19 रूग्णांच्या पार्श्वभूमीवर घेतला असल्याचं सांगितलं आहे. सरकारकडून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.