COVAXIN Clinical Test: कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिन ची दुसरी क्लिनिकल चाचणी नागपुर मध्ये सुरु

आज नागपुर मध्ये या लसीची चाचणी केली जात आहे.

Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

हैदराबाद स्थित भारत बायोटेक (Bharat Biotech) या फार्मा कंपनीने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी COVAXIN लसीच्या दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीला सुरुवात झाली आहे. आज नागपुर मध्ये या लसीची चाचणी केली जात आहे. नागपूरस्थित गिलूरकर रुग्णालयाने स्वदेशी बनावटीच्या COVAXIN च्या दुसर्‍या फेरीची चाचणी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यात 55 स्वयंसेवकांवर क्लिनिकल चाचणी झाली होती. यावेळी कोणतेही साईड इफेक्टस जाणवले नाहीत. इंंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) यांच्या सहकार्याने COVAXIN ही लस विकसित करण्यात आली आहे. SARS-CoV-2 लसीचे पुण्यातील (Pune) NIV येथे संशोधन करून पुढे भारत बायोटेकमध्ये हस्तांतरण करण्यात आले होते.

गिलूरकर रूग्णालयाचे संचालक चंद्रशेखर गिलूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या स्वयंसेवकांना लसीचा प्रथम डोस देण्यात आला होता, त्यांचे रक्ताचे नमुने गोळा करून त्यामध्ये असलेल्या अ‍ॅन्टीबॉडीजची तपासणी करण्यासाठी पाठविले जाईल. ज्या नंंतर लस चाचणी 28 दिवस, 42 दिवस, 104 दिवस आणि 194 व्या दिवसानंतर केली जाईल. प्रत्येक डोसनंतर, अँटीबॉडीजची वाढ तपासण्यासाठी रक्ताचे नमुने गोळा केले जातील.

पहा ट्विट

दुसरीकडे,कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग नियंत्रणासाठी प्रभावी लस (Coronavirus Vaccine) बनवल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी स्वत:च ही माहिती दिली. रशियात बनलेली कोरोना व्हायरस लस पहिल्यांदा आपल्या मुलीला देण्यात आल्याचेही पुतिन यांनी म्हटले आहे.