IPL Auction 2025 Live

औरंगाबाद मध्ये 90 नव्या Coronavirus रुग्णांसह जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1936 वर

तसेच आतापर्यंत 96 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सागंण्यात येत आहे. सद्य स्थितीत राज्यात 686 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात झपाट्याने कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून काल (5 जून) दिवसभरात 2436 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 80,229 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2849 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 35,156 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातही ही संख्या झपाट्याने वाढत आहे. औरंगाबाद गेल्या 24 तासांत 90 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1936 वर पोहोचली आहे.

त्याचबरोबर औरंगाबाद मध्ये 1154 वर कोरोनाबाधित रुगिण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत 96 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सागंण्यात येत आहे. सद्य स्थितीत राज्यात 686 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? जाणून घ्या राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

तर भारतात गेल्या 24 तासांत नवे 9887 कोरोना रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,36,657 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 294 रुग्ण दगावले असून एकूण मृतांचा आकडा 6642 वर पोहोचला आहे. सद्य घडीला देसात 1,15,942 रुग्णांवर उपचार सुरु असून 1,14,073 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.