Coronavirus Vaccine Update: सीरम इंस्टिट्युटची दुसरी लस Covovax जून मध्ये लॉन्च होण्याची शक्यता, आदर पूनवाला यांनी दिली महत्वाची माहिती

कोरोनावरील ही दुसरी लस येत्या जून 2021 पर्यंत लॉन्च करु शकतात.

Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

Coronavirus Vaccine Update: पुणे येथील सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी शनिवारी असे म्हटले की, त्यांच्या कंपनीने आणखी एका लसीची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनावरील ही दुसरी लस येत्या जून 2021 पर्यंत लॉन्च करु शकतात. पुण्यात स्थित असलेल्या सीरम या कंपनीने याआधी सुद्धा एक लस तयार केली आहे. त्या लसीला युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड आणि ब्रिटिश स्विडिश कंपनी AstraZeneca यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे.(Pulse Polio Drive: 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान देशभरात विशेष पल्स पोलिओ अभियान)

केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीचे 11 मिलियन डोस सध्याच्या लसीकरणाच्या अभियानासाठी खरेदी केले आहेत. आदर पूनावाला यांनी एक ट्विट करत असे म्हटले आहे की, Novavax सोबत करण्यात आलेल्या करारामुळे मोठी संभाव्यता निर्माण झाली आहे. त्यांनी भारतात ट्रायल सुद्धा सुरु करण्यासाठी अप्लाय केले आहे. Covovax ही जून 2021 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते अशी अपेक्षा आदर पूनावाला यांनी व्यक्त केली आहे.(Coronavirus Vaccination Rumours: कोरोना व्हायरस लसीबाबत अफवा किंवा खोटी माहिती पसरवल्यास होणार कारवाई; केंद्राचे राज्यांना आदेश)

Tweet:

देशात 16 जानेवारी पासून कोविड19 च्या लसीचे लसीकरण अभियान सुरु करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण हे सर्वात मोठे अभियान असून त्यात जवळजवळ तीन कोटी आरोग्य आणि फ्रंटलाइन वर्कर्सला प्राथमिकता दिली जाणार आहे. या महिन्यापर्यंत जवळजवळ 33 लाखांहून अधिक हेल्थकेअर वर्कर्सचे लसीकरण झाले आहे. आता केंद्र सरकारने सर्व राज्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शिल्लक राहिलेल्या हेल्थवर्कर्ससह फ्रंटलाइन वर्कर्सला लस दिली जावी असे निर्देशन दिले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif