Coronavirus Vaccination: 'Salman Khan सारख्या सेलिब्रिटींनी मुस्लीम लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, जागरुकता निर्माण केली पाहिजे'- मुंबई महापौर Kishori Pednekar

राज्यातील दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या 3 कोटी 46 लाखांवर पोहोचली आहे. यासह महाराष्ट्रातील 80% नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे

Kishori Pednekar | (Photo Credits: ANI)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी बुधवारी बॉलिवूड सेलिब्रिटींना सोशल मीडियाच्या माध्यमातून कोविड-19 लसीकरणाबाबत (Coronavirus Vaccination) जनजागृती करण्याचे आवाहन केले. महापौर म्हणाल्या की, महापालिकेने शहरात विक्रमी प्रमाणात लसीकरण केले आहे, परंतु अजूनही अनेक लोकांनी धार्मिक कारणांमुळे, अंधश्रद्धा आणि निरक्षरतेमुळे लस घेतलेली नाही. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी कोविड-19 लसीकरणाबाबत ‘मुस्लिमांमध्ये असलेल्या धार्मिक आशंका’ बद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी सलमान खान (Salman Khan) सारखे सेलिब्रिटी मुस्लिमांमध्ये लसीकरणासाठी जागरूकता निर्माण करण्यास मदत करू शकतील, अशी आशा व्यक्त केली.

त्या पुढे म्हणाल्या, ‘जेव्हा जेव्हा लसीकरण होते तेव्हा मुस्लिम लोक धार्मिक कारणांमुळे लस घेत नाहीत. अशावेळी त्यांच्या लसीकरणाला विलंब झाला आहे. आशा आहे की, मुस्लीम लोक लवकर लसीचे डोस घेतील आणि सलमान खानसारख्या अभिनेत्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पेडणेकर म्हणाल्या की, लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी पुढे आले आहेत. तसेच बॉलीवूड स्टार्सही एक मिनिटाचे व्हिडिओ बनवू शकतात आणि लोकांमध्ये लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करू शकतात.

यापूर्वी आज महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, राज्य सरकार कोविड-19 लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी धार्मिक नेते आणि सलमान खानसारख्या सेलिब्रिटींशी चर्चा करत आहे. ANI शी बोलताना श्री. टोपे म्हणाले, ‘जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करून घेण्यासाठी, लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही धार्मिक नेते, सेलिब्रेटींची मदत घेणार आहोत. जनजागृती मोहिमेसाठी सलमान खानसारख्या सेलिब्रेटींना ऑनबोर्ड आणण्यासाठी चर्चा सुरु आहे. (हेही वाचा: मुस्लिम समुदायाला लसीचे डोस घेण्यासाठी प्रोत्साहन करणार सलमान खान)

दरम्यान, राज्यातील सात कोटींहून अधिक नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीची किमान एक मात्रा देण्यात आली आहे. राज्यातील दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या 3 कोटी 46 लाखांवर पोहोचली आहे. यासह महाराष्ट्रातील 80% नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरीत 20% नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif