पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना व्हायरस मुळे तीन सख्ख्या भावांचा मृत्यु; वाचा कलापुरे कुटुंबाची हृदयस्पर्शी व्यथा
कलापुरे कुटुंंब ज्यांचे राजकीय, कामगार, कुस्तीगीर क्षेत्रातील घराणे म्ह्णुन नाव प्रसिद्ध होते त्यातील तीन भाउ म्हणजेच दिलीप कलापुरे ,पोपट कलापुरे, ज्ञानोबा कलापुरे यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत
पिंपरी चिंचवड (Coronavirus In Pimpari Chinchwad) भागात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच झपाट्याने प्रसार सुरु आहे, आजवर या जीवघेण्या विषाणूने शेकडो बळी सुद्धा घेतले आहेत, अलिकडेच कोरोना व्हायरसमुळे पिंपरी चिंचवड मधील खराळवाडी येथे राहणार्या तीन सख्ख्या भावांंचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. कलापुरे कुटुंंब ज्यांचे राजकीय, कामगार, कुस्तीगीर क्षेत्रातील घराणे म्ह्णुन नाव प्रसिद्ध होते त्यातील तीन भाउ म्हणजेच दिलीप कलापुरे ,पोपट कलापुरे, ज्ञानोबा कलापुरे यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. या तिघांचे वय 60 च्या वर होते, हावयोगट कोरोनाला बळी पडणार्यांचा आहे. त्यामुळे सरकार तर्फे सुद्धा घरातील वयस्कर मंंडळींची काळजी घेण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख पार; सध्या कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण आहेत जाणून घ्या
प्राप्त माहिती नुसार, दिलीप धर्माची कलापुरे (वय 61) यांना सुरुवातीला अशक्तपणा वाटल्याने लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनिया आणि कोरोना चे निदान झाले.उपचार सुरु असतानाच 10 जुलै रोजी त्यांचे निधन झाले. या धक्क्याने दोनच दिवसात थोरले भाऊ पोपट कलापुरे यांना सुद्धा थकवा जाणवु लागला चाचणी केली असता ते सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले 12 जुलै रोजी त्यांनाही देवाज्ञा झाली. दोन्ही भावांच्या निधनानंंतर तिसरे बंंधु ज्ञानोबा कलापुरे यांंची ही प्रकृती बिघडु लागली. 17 जुलै रोजी ज्ञानोबा यांचे सुद्धा कोरोनाची लागण होउन निधन झाले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भागात आतापर्यंत 10,507 जणांना कोरोनाची लागण झाली आहे यापैकी 198 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन मध्ये पूर्णपणे लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे.