IPL Auction 2025 Live

Coronavirus Update: पिंपरी चिंचवड मध्ये 2 चिमुकल्यांसहित कोरोनाचे आठ नवे रुग्ण; जिल्ह्यातील COVID19 रुग्णांची संख्या 132 वर

पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) भागात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) आठ नवे रुग्ण आढळून आले आहेत, विशेष म्हणजे यामध्ये अवघ्या दीड महिन्याची मुलगी आणि चार महिन्याच्या मुलाला सुद्धा कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad)  भागात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) आठ नवे रुग्ण आढळून आले आहेत, विशेष म्हणजे यामध्ये अवघ्या दीड महिन्याची मुलगी आणि चार महिन्याच्या मुलाला सुद्धा कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. यासहित पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधितांचा आकडा हा 132 वर पोहचला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे रेड, ग्रीन आणि ऑरेंज अशा तीन झोन मध्ये विभाजन करण्यात आले आहे. यानुसार, पिंपरी चिंचवड हा भाग सुद्धा अधिक कोरोना रुग्ण असल्याने रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. याभागात अत्यावश्यक वस्तू सोडल्यास अन्य व्यवसायांना अद्याप सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील तुम्ही राहात असणारा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो जे जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

पिंपरी चिंचवड भागात 132 कोरोना बाधित रुग्ण असल्याने अजूनही भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर या भागातील 21 वेगळे भाग हे कोरोनाच कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सुरुवातीपासूनच मुंबई, पुणे या मोठ्या शहरांच्या सोबतीने पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची वाढ वेगाने होत होती हा आकडा अजूनही चिंताजनकच आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

ANI ट्विट

दरम्यान, दुसरीकडे दिवसागणिक महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा सुद्धा झपाट्याने वाढत आहे. आज घडीला राज्यात 14 हजार 541 कोरोना रुग्ण असून यापैकी 2645 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.