Coronavirus Update: महाराष्ट्र पोलीसांंवरील कोरोना संकटाचा वेग मंदावला; 48 तासात एकही नवा कोरोना रुग्ण नाही

काल मात्र एका रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला होता मात्र आजच्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात एकही नवा कोरोना रुग्ण किंवा एकही नवा मृत्यू झालेला नाही.

Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्र पोलिसांवरील (Maharashtra Police) कोरोनाचे (Coronavirus Update)  संकट आता हळू हळू मंदावले आहे. मागील दोन दिवसात राज्यातील पोलीस दलात एकही नवा कोरोना रुग्ण आढळलेला नाही. काल मात्र एका रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला होता मात्र आजच्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात एकही नवा कोरोना रुग्ण किंवा एकही नवा मृत्यू झालेला नाही. एकीकडे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचे आकडे दिवसागणिक वाढत असताना ही अत्यंत दिलासादायक बाब सिद्ध होत आहे. प्राप्त माहितीनुसार सद्य घडीला राज्यातील 2,562 पोलीस हे कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत 34 कोव्हीड योद्धा पोलिसांनी आपले प्राण गमावले आहेत. Mumbai Police: कोरोना संशयित पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्याच्या व्हायरल व्हिडिओेचे मुंबई पोलिसांकडून खंडण

कोरोनाचे संकट पसरत असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस यंत्रणा सुद्धा काम करत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो.लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1 लाख 68 हजार फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. नागरिकांच्या समस्यांवर उपाय शोधताना त्यांची मदत करताना काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, मात्र तरीही जीव धोक्यात घालून हे सर्व योद्धे ऑन ड्युटी आहेत. 

ANI ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) सद्य घडीला कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 88,529 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 3,169 रुग्ण दगावले असून 40,975 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.