ठाणे येथे एकाच दिवशी 371 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने स्थानिक बंदची हाक

राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नव्याने आढळून येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान आता ठाण्यात शनिवारी एकाच दिवशी नव्याने 371 कोरोना संक्रमितांची भर पडल्याने खळबळ उडाली आहे.

Coronavirus Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नव्याने आढळून येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान आता ठाण्यात शनिवारी एकाच दिवशी नव्याने 371 कोरोना संक्रमितांची भर पडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे ठाणे महापालिकानेकडून स्थानिक बंदचे आदेश दिले आहेत. ठाण्यात आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 7,827 वर पोहचला आहे.(कोरोना संकटाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गार)

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास आकडा 152765 वर पोहचला आहे. तर 65829 जणांवर उपचार सुरु असून 7106 जणांचा बळी गेला आहे. त्याचसोबत 79815 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार नियमात शिथीलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परंतु यावेळी अटी आणि नियमांचे पालन करण्यात यावे असे आवाहन सुद्धा नागरिकांसह दुकानदारांना देण्यात आले आहेत.(Coronavirus Update: ठाणे, कल्याण येथे एकाच दिवशी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद)

ठाण्यात आतापर्यंत तीन सरकारी डॉक्टर्स, 20 पोलीस कर्मचारी, सात अधिकारी आणि 13 कॉन्स्टेबल यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनाबाधित डॉक्टरांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून हे सर्वजण एकत्रितपणे बालरोग विभागात काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आणखी 14 कोरोनाच्या रुग्णांचा बळी गेल्याने आकडा 263 वर पोहचला आहे.

अतिरिक्त नगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी असे म्हटले आहे की, जर नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही आणि अशाच पद्धतीने कोरोनाबाधितांचा आकड्यात वाढ झाल्यास बंदचे आदेश कायम राहणार आहेत. नौपाडा, कळवा आणि माझिवाडा बाळकुमसह अन्य ठिकाणी अधिकारी आणि स्थानिक वॉर्डातील राजकीय नेत्यांनी लॉकडाऊन संबंधित तयारी सुरु केली आहे. लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी नागरिकांना सुद्धा सांगितले जाणार आहे. जेणेकरुन नागरिकांना त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा साठ आधीच करुन ठेवतील असे नगरसेवक संजय भोईल यांनी म्हटले आहे.