Coronavirus Update: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सहित कोणत्या जिल्ह्यात COVID19 चे किती रुग्ण? महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी जाणून घ्या

महाराष्ट्रात मुंबई,ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद हे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेले टॉप 5 जिल्हे आहेत. या जिल्ह्यांसहित तुम्ही राहत असणाऱ्या ठिकाणी कोरोनाचे एकूण किती रुग्ण आहेत हे आता आपण पाहणार आहोत.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची एकूण संख्या 29,100 इतकी झाली आहे. मागील 24 तासात राज्यात कोरना संक्रमित 1,576 नव्या रुग्णांची तर 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1,068 इतकी झाली आहे. दुसरीकडे दिलासादायक माहिती म्हणजे आतापर्यंत राज्यातील 6,564 जणांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. या आकडेवारी नुसार, सद्य घडीला महाराष्ट्रात कोरोनाचे 21,467 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मुंबई (Mumbai),ठाणे (Thane), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad) हे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेले टॉप 5  जिल्हे आहेत. या जिल्ह्यांसहित तुम्ही राहत असणाऱ्या ठिकाणी कोरोनाचे एकूण किती रुग्ण आहेत हे आता आपण पाहणार आहोत.

कोरोनाच्या प्रसारानुसार महाराष्ट्रात रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये जिल्ह्यांचे विभाजन करण्यात आले आहे. तुम्ही राहत असणारा जिल्हा नेमक्या कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

 

COVID-19 पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्हा/मनपा निहाय यादी:

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 17,671 655
2 ठाणे 189 3
3 ठाणे मनपा 1302 11
4 नवी मुंबई मनपा 1117 14
5 कल्याण डोंबिवली मनपा 444 6
6 उल्हासनगर मनपा 86 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 42 2
8 मीरा भाईंदर 260 2
9 पालघर 42 2
10 वसई विरार मनपा 321 11
11 रायगड 212 2
12 पनवेल मनपा 180 10
ठाणे मंडळ एकूण 21,925 718
1 नाशिक 99 0
2 नाशिक मनपा 63 0
3 मालेगाव मनपा 636 34
4 अहमदनगर 56 3
5 अहमदनगर मनपा 15 0
6 धुळे 10 3
7 धुळे मनपा 64 5
8 जळगाव 190 23
9 जळगाव मनपा 56 4
10 नंदुरबार 22 2
नाशिक मंडळ एकूण 1238 74
1 पुणे 185 5
2 पुणे मनपा 3141 172
3 पिंपरी-चिंचवड मनपा 155 4
4 सोलापूर 9 1
5 सोलापूर मनपा 356 20
6 सातारा 126 2
पुणे मंडळ एकूण 3972 204
1 कोल्हापूर 19 1
2 कोल्हापूर मनपा 6 0
3 सांगली 37 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 7 1
5 सिंधुदुर्ग 7 0
6 रत्नागिरी 86 3
कोल्हापूर मंडळ एकूण 162 5
1 औरंगाबाद 95 0
2 औरंगाबाद मनपा 683 20
3 जालना 21 0
4 हिंगोली 66 0
5 परभणी 5 1
6 परभणी मनपा 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 871 21
1 लातूर 32 1
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 6 0
5 बीड 1 0
6 नांदेड 5 0
7 नांदेड मनपा 52 4
लातूर मंडळ एकूण 96 5
1 अकोला 19 1
2 अकोला मनपा 207 13
3 अमरावती 6 2
4 अमवरावती मनपा 92 11
5 यवतमाळ 99 0
6 बुलढाणा 26 1
7 वाशीम 3 0
अकोला मंडळ एकूण 452 28
1 नागपूर 2 0
2 नागपूर मनपा 322 2
3 वर्धा 1 1
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 1 0
7 चंद्रपूर मनपा 4 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 343 3
1 इतर राज्य 41 10
एकूण 29,100 1068

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधित शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जात आहेत. धारावी सारख्या हॉट स्पॉट मध्ये तर डॉक्टरांची मोठी टीम रहिवाशांचे स्कॅनिंग, स्वॅब नमुने गोळा करण्यासाठी कार्यरत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,50,436 कोरोना चाचण्या झाल्या असून त्यापैकी केवळ 29,100 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात 3,29,302 लोक होम क्वारंटाईन असून 16,306 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now