Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे नवे 28 रुग्ण आढळल्याने आकडा 181 वर पोहचला

तर राज्यात कोरोनाबाधित नवे 28 रुग्ण आढळून आले आहेत.

Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

देशात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येत्या 14 एप्रिल पर्यंत भारतासह महाराष्ट्रात लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. या लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक गोष्टींची खरेदी करण्यासाठी गर्दी करु नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच राज्यातील सरकारकडून प्रत्येक वेळी नागरिकांना नियमांचे पालन करण्यासोबत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर राज्यात कोरोनाबाधित नवे 28 रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्र सरकारने कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यात नवे कोरोनाचे 28 रुग्ण आढळून आले आहेत. तर 26 रुग्णांना डिस्चार्ज तर 104 जणांची कोरोना व्हायरसची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र एकूण राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 181 वर पोहचला आहे. तसेच काही वेळापूर्वीच मुंबई महापालिकेने सुद्धा राज्यात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. त्या 6 पैकी 4 जण हे मुंबईतील असल्याचे सांगण्यात आले होते.(Coronavirus: 1 एप्रिल पासून महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत कोरोना व्हायरससंबंधित उपचार घेता येणार, महाराष्ट्र सरकारचा निर्णय)

दरम्यान, कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे केलेल्या उपाययोजनांमध्ये सहभागी होण्यासाठी "मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19" या नावाने सुरु करण्यात

आली आहे. त्यामुळे नागरिकांनी खात्यामध्ये सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन केले आहे. त्याचसोबत कोरोना विषाणूसाठी नेगेटीव्ह पण घरातील आनंदासाठी वातावरण पॉझिटीव्ह ठेवा आणि कुटुंबीयांसमवेत जो वेळ मिळतोय तो हसत खेळत घालवा असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.