सोलापूर: जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न, गर्दी पांगवली असता पोलिसांवर गावकऱ्यांकडून दगडफेक
तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऐवढेच नाही तर 21 दिवसांच्या लॉकडाउनच्या परिस्थितीत आपल्याला कोरोनाच्या विरोधात लढा देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) देशावर आलेले संकट दूर करण्यासाठी सरकार ठोस पावले उचलली जात आहेत. तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऐवढेच नाही तर 21 दिवसांच्या लॉकडाउनच्या परिस्थितीत आपल्याला कोरोनाच्या विरोधात लढा देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले होते. महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा आता 190 च्या पार गेला आहे. याच पार्श्वभुमीर विविध ठिकाणी कमल 144 लागू करण्यात आला आहे. मात्र सोलापूर (Solapur) येथे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.
वागदरी येथील गावकऱ्यांनी जमावबंदीचा आदेश गावात असून ही तो मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला असता यात्रा थांबवण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत यात्रा कमिटीचे पंच आणि 200 पेक्षा अधिक गावकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तर गेल्या दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचारी किंवा पोलिसांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले होते.(Coronavirus: मुंबई पोलिसांकडून 1 करोड रुपयांची किंमत असलेले 200 मास्कचे बॉक्स जप्त, 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल)
तसेच बीड येथे सुद्धा राज्यात संचारबंदी आणि जिल्ह्याच्या सीमा बंदचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून पोकळ बांबूचे फटके सुद्धा दिले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर आता बीड येथे घराबाहेर थांबण्यास पोलिसांनी नागरिकांना विरोध केला. यामुळे संतप्त झालेल्या टोळक्याने पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.