Coronavirus: पुणे शहरात मॉल बंद; पुणेकरांसाठी सूचक नियमावली

विद्यार्थ्यांनी कारण नसताना बाहेर भटकू नये. वसतीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहातच राहावे. जर बाहेर जाण्याची गरज पडलीच तर, सोबत ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे, असेही दीपक म्हैसकर यांनी या वेळी सांगितले.

Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) शहरात मॉल बंद (Shut Down Mall in Pune) ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शहात मॉल (Mall) बंद असले तरी मॉलमधील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने मात्र सुरुच राहतील. यात औषधविक्री, किराणा माल, अन्नधान्य, दूध आणि भाजीपाला विक्री करणारी दुकाने सुरु राहणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Deepak Mhaisekar) यांनी ही माहिती दिली. पुण्यातील चित्रपटगृहं आणि उद्यानं बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच, आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे अवाहनही म्हैसेकर यांनी या वेळी केले. प्रशासनाकडून नागरिकांना अवाहनाच्या रुपात एक सूचक नियमावलीच देण्यात आली आहेत.

पुणेकरांसाठी मार्गदर्शक सूचना आणि नियमावली

(हेही वाचा Coronavirus: पुण्यातील 16 रुग्णांना सुट्टी; 93 जणांच्या ग्रुपमधील एकास कोरोना व्हायरस बाधा, आव्हान वाढले)

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या

क्र शहराचे नाव रुग्णांची संख्या
1 पुणे 15
2 मुंबई 05
3 ठाणे 01
4 कल्याण 01
5 नवी मुंबई 02
6 नागपूर 04
7 यवतमाळ 02
8 अहमदनगर 01
9 औरंगाबाद 01
एकूण 32

दरम्यान, वसितीगृह खाली करण्याबाबत कोणत्याही विद्यापीठांना आदेश देण्यात आले नाहीत. वसतीगृहं खाली करण्याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा त्या त्या विद्यापीठांचा राहील. मात्र, नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये. तसेच परस्परांमध्ये योग्य अंतर बाळगणे आवश्यक आहे. आवश्यकता भासली तर कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी कारण नसताना बाहेर भटकू नये. वसतीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहातच राहावे. जर बाहेर जाण्याची गरज पडलीच तर, सोबत ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे, असेही दीपक म्हैसकर यांनी या वेळी सांगितले.