Coronavirus: 'टाळ्या, थाळ्या आणि दिवे, अशाने युद्ध हरु'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दै. सामना संपादकीयातून टीकास्त्र

लोकांनी शिस्त पाळायलाच हवी असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. ठाकरे हे लोकांशी सहज सरळ पद्धतीने, कोणताही गोंधळ उडणार नाही अशा रीतीने संवाद साधत आहेत. कोरोनाशी जे युद्ध सुरु आहे त्या युद्धात लढण्यासाठी अशाच सेनापतीची गरज आहे, असे कौतुकोद्गारही मुंख्यमंत्र्याविषयी सामना संपादकीयातून काढण्यात आहेत.

PM Modi | (Photo Credits: Twitter)

शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Daily Saamana) संपादकियातून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधातील लढाईत केलेल्या टाळ्या, थाळ्या वादन, मेणबत्ती जाळणे, दिवे लावणे वैगेरे अवाहनांवर जोरदार टीका केली आहे. पानिपतच्या युद्धात आपला पराभव झाला होता तो अफवा, नियोजनशून्यता यामुळे. कोरना युद्धाची स्थिती पानिपतसारखी होऊ नये. जनतेचा सदाशिवराव भाऊ होऊ नये. हाती मशाली आहेत, त्यात स्वत:चेच कपडे जळू नये. पंतप्रधानांनी स्पष्ट सांगावे; जे सांगितले तेच घडावे. उलट वागणाऱ्यांना अद्दल घडावी. फक्त मरकजवालेच नियम मोडतात असे नाही! मरकजवाल्यांवर कोरोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत, असे दै. सामना संपादकीयात म्हटले आहे.

दरम्यान, लोकांनी शिस्त पाळायलाच हवी असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. ठाकरे हे लोकांशी सहज सरळ पद्धतीने, कोणताही गोंधळ उडणार नाही अशा रीतीने संवाद साधत आहेत. कोरोनाशी जे युद्ध सुरु आहे त्या युद्धात लढण्यासाठी अशाच सेनापतीची गरज आहे, असे कौतुकोद्गारही मुंख्यमंत्र्याविषयी सामना संपादकीयातून काढण्यात आहेत.

सामना संपादकीयात पुढे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांच्या अवाहनानंतरही अखेर जे व्हायचे तेच झाले. कोरोना व्हायरससशी लढण्यासाठी पंतप्रदानांनी जी उपाययोजना सांगितली त्यात सर्वप्रथम त्यांनी लोकांना घराच्या गॅलरीत येऊन टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगितले. रविवारी रात्री घरातील सर्व दिवे बंद करुन पणत्या मेणबत्या लावाव्यात असे अवाहन केले. पण लोकांनी रविवारी जे केले ते पाहण्यासारखे आहे. कोहीतरी गडबड निश्चित आहे. पंतप्रधानांचे म्हणने लोकांपर्यंत पोहोचत नाही असे दिसते. अन्यथा रविवारी देशात अनेक ठिकाणी जे दिव्य प्रताप झाले ते घडले नसते. लोकांनी काळोख केला हे खरे पण त्या काळोखात लोक पुन्हा झुंड करुन रस्त्यांवर उतरले. हातात मेणबत्या, टॉर्च, मोबाईलच्या बॅटऱ्या नाचवत थयथया नाचू लागले. त्यामुळे कोरोनाशी लढताना ज्या सोशल डिस्टंन्सीगची सगळ्यात जास्त गरज आहे त्याची ऐशीची तैशी झाली. पंतप्रधानांनाही हा तमाशा नक्कीच अपेक्षित नसावा, असेही सामना संपादकीयात म्हटले आहे. (हेही वाचा, Lockdown: लॉकडाउन आणखी वाढणार की संपणार? पाहा काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी)

दरम्यान, पंतप्रधानांना जे सांगायचे आहे त्याचा विपरीत अर्थ काढून लोक आपापली सोय पाहात आहेत. दुसरे असे की, पंतप्रधानांचा लोकाशी नीट संवाद होत नाही. शेवटचा अर्थ असा की, जे घडते तसे उत्सवी वातावरण पंतप्रधानांनाच हवे आहे, असा टीकेचा सूरही सामना संपादकीयात उमटताना दिसतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now