पुणेः कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड परिसरातील 3 शाळा बंद

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून खबरदारीच्या उपाययोजना प्रशासनाकडून राबवण्यात येत आहेत.

Coronavirus (Photo Credit: IANS)

पुण्यात (Pune) दाखल झालेल्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून खबरदारीच्या उपाययोजना प्रशासनाकडून राबवण्यात येत आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिंहगड (Sinhgad) परिसरातील 3 शाळा दोन-तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नांदेड सिटी स्कूल आणि पवार पब्लिक स्कूल या दोन शाळा शनिवार पर्यंत बंद राहणार असून डिएसके शाळा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. (पुण्यात कोरोना व्हायरसचे आणखी 3 रुग्ण; शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहचली)

पुण्यातील एका दांम्पत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांनतर त्या दांम्पत्याच्या मुलीला आणि त्यांनी प्रवास केलेल्या टॅक्सीच्या ड्रायव्हरला आणि सहप्रवाशाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक वाढू नये. तसंच शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणआयुक्त विशाल सोळंकी यांनी देखील विद्यार्थ्यांमध्ये कोरोना व्हायरसची जागरुकता निर्माण करण्यासाठी शाळांना विशेष सूचना दिल्या आहेत.

PTI Tweet:

दरम्यान, कोरोनाग्रस्त दांम्पत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली असून नागरिकांनी घाबरुन न जाता दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील IT कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची मूभा दिली आहे.