पिंपरीत कोरोनामुक्त महिलेची ढोल ताशे वाजवत मिरवणूक, माजी महापौरांसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवस रात्र उपचार करत आहेत.

Coronavirus Pandemic (Photo Credits: IANS)

देशभरासह महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवस रात्र उपचार करत आहेत. याच दरम्यान पिंपरीत एक महिला कोरोनामुक्त होऊन घरी आल्याने तिची ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढण्यात आली. मात्र नागरिकांना लॉकडाउनच्या काळात सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यासह गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु पिंपरीत (Pimpari) मिरवणूक काढताना गर्दी झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी माजी महापौरांसह अन्य चार जणांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड येथे गुरुवारी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या महिलेला डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर घरी परतली. त्यावेळी तिचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी पुण्याच्या माजी महापौर आणि जेष्ठ नगरसेविका सुद्धा उपस्थित होत्या. मात्र सोशल डिस्टंन्सिंगचा या वेळी फज्जा उडाल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात सुद्धा व्हायरल झाला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु कोणालाही ताब्यात घेतले नाही आहे.(पुण्यात 4 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात COVID-19 बाधित मृतांची एकूण संख्या 99 वर)

 दरम्यान, मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. रेड झोन मधील क्षेत्रात लॉकडाउनच्या नियमाचे अधिक कठोर पालन करावे अशी सुचना असताना त्याचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या विरोधाती लढाई घरातच थांबून जिंकणे हा सध्या एक मार्ग असल्याचे ही सांगण्यात आले आहे. तर सध्या कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार केले जात आहेत.


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif