Coronavirus: पुणे येथे NOCCA Robotics यांच्याकडून कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी व्हॅन्टिलेटर्सची निर्मिती

याच परिस्थितीत देशातील सरकारकडून कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

NOCCA Robotics (Photo Credits-ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याच्या रुग्णांचा आकडा 1834 पर्यंत पोहचला आहे. याच परिस्थितीत देशातील सरकारकडून कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत आहेत.ऐवढेच नाही तर पोलीस सुद्धा लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर गस्त घालून नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत आहेत. दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या परिस्थितीत आता पुण्यातील NOCCA Robotics यांच्याकडून कमी किंमतीच्या व्हॅन्टिलेटर्सची निर्मिती केली जात आहे.

नोका रोबॉटिक्स कंपनीचे को-फाउंडर निखिल कुरळे यांनी असे सांगितले आहे की, सध्या आम्ही 20 व्हॅन्टिलेटर्स बनवले आहेत. ते टेस्टिंगसाठी रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्यात अजून व्हेन्टिलेटर्स बनवण्यात आले आहेत. या व्हेन्टिलेटर्सची अंदाजे किंमत 50 हजार रुपयापर्यंत असणार असल्याचे ही निखिल यांनी म्हटले आहे.(बीड: Lock Down निमित्त टाकळी ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय; विनाकारण हिंडताना आढळताच काढणार गाढवावरून धिंड)

कोरोना विरोधातील लढाईत राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत. या सर्वांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानले आहेत. कोरोना विरोधातील लढाईमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी आघाडीचे सैनिक असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. तुमचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. या लढाईमध्ये तुम्ही सुद्धा आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असे भावनिक आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे.