Pune Coronavirus: पुण्यात 1 ते 3 मे दरम्यान हॉटस्पॉट्समधील सर्व दुकाने बंद; रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्स चालू ठेवण्याची परवानगी

सध्या राज्यामध्ये मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) या ठिकाणी कोरोना बाधितांची सर्वाधित प्रकरणे आहेत,

Coronavirus Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात (Maharashtra) लॉक डाऊनचे (Lockdown) काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी प्रशासन झटत आहे. सध्या राज्यामध्ये मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) या ठिकाणी कोरोना बाधितांची सर्वाधित प्रकरणे आहेत, त्यामुळे या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे. आता पुण्याचे सह पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे (Joint Police Commissioner Ravindra Shisve) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात 1 मे ते 3 मे या दरम्यान हॉटस्पॉट्समधील सर्व दुकाने बंद ठेवण्यचा आदेश दिला गेला आहे. यामध्ये रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्सना सूट देण्यात आली आहे.

एएनआय ट्विट -

शहरातील हॉटस्पॉट्समधील दुधाची दुकाने सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेतच सुरु राहणार आहेत. तसेच दुधाचे घरपोच वितरण हे सकाळी 6 ते 10 या दरम्यानच होणार आहे. अशा प्रकारे जे परिसरात हॉटस्पॉट्स आहेत तिथला ‘अतिरिक्त मनाई’ आदेश 1 मे सकाळी 6 ते 3 मे रात्री 12 वाजेपर्यंत लागू असेल. लॉक डाऊन असूनही शहरातील अनेक ठिकाणी या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. सध्या शहरातील वाढता कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता प्रशासनाने कडक पावले उचलत हा निर्णय घेतला आहे.

अशा प्रकारे पुढचे तीन दिवस, कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जीवनावश्यक व सेवा (किराणा माल, भाजीपाला, फळे, चिकन, मटण, अंडी) यांची विक्री केंद्रे, दुकाने, वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. (हेही वाचा: सर्वांना एकच कायदा; लॉक डाऊनचा नियम मोडून मुंबईहून सांगलीकडे येत असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल)

पुण्यातील या भागात हा आदेश लागू असेल –

समर्थ पोलीस स्टेशन संपूर्ण कार्यक्षेत्र, खडक पोलीस स्टेशन, फरासखाना पोलिस स्टेशन (कसबा पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ, शहरातील सर्व पेठ परिसर), गुलटेकडी, महर्षींनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर, खद्दा झोपडपट्टी - नवीन मोदीखाना, पुना कॉलेज रोड, मोदीखाना कुरेशी मस्जिद जवळचा परिसर, भीमपुरा लेन, बाबजान दर्गा, क्वाटर गेट रोड, शिवाजी मार्केट, सरबतवाला चौक, शितलादेवी मंदिर रोड,  ताडीवाला रोड, तळजाई वसाहत, बालाजीनगर - पर्वती दर्शन परिसर, लक्ष्मीनगर, गाडीतळ, चित्रा चौक परिसर,  पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती पाटकर प्लॉट

दरम्यान, पुण्यात 12 तासांत कोरोना बाधित 120 रुग्णांची नोंद झाली आहे, यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,722 झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif