Coronavirus: पुणे येथे हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या 15 नागरिकांचा एकाच गाडीतून प्रवास, पोलिसांकडून प्रकार उघडकीस
तर महाराष्ट्रात कोकना बाधितांचा आकडा 300 च्या पार गेला आहे. ऐवढेच नाही तर सरकारकडून लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घराबाहेर न पडण्यास आवाहन केले आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. तर महाराष्ट्रात कोकना बाधितांचा आकडा 300 च्या पार गेला आहे. ऐवढेच नाही तर सरकारकडून लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घराबाहेर न पडण्यास आवाहन केले आहे. तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. पण दुसऱ्या बाजूला ज्या व्यक्तींना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे त्यांनी सुद्धा स्वत:ची काळजी घेत घरातच रहावे असे सांगितले आहे. याच पार्श्वभुमीवर पुणे येथे होम क्वारंटाइनचा शिक्का हातवर असून ही 15 जण एकाच गाडीतून प्रवास करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
वडगाव मावळ पोलिसांनी नाकाबंदी असताना पुण्यातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका गाडीला अडवण्यात आले. या गाडीमध्ये जवळजवळ 15 व्यक्ती प्रवास करत होते पण त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का असल्याची बाब समोर आली. तर सदर कुटुंब हे जनता कर्फ्यूच्या रात्री एका अंत्यविधीसाठी उस्मानाबाद येथे गेले होते. त्यानंतर लॉकडाउनचे आदेश आणि हातावर शिक्का असून सुद्धा त्यांनी मुंबईच्या प्रवासासाठी निघाले. या प्रकरणी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून कोरोनाच्या उपाययोजनांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल केला आहे.(Coronavirus: मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या पनवेल येथील CISF च्या 5 जवानांना कोरोना व्हायरस लागण)
तर महाराष्ट्रात 3 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. दरम्यान, बुलढाण्यात एक तर, पुणे येथे 2 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 338 वर पोहचली आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 47 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधीत झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच 170 हून अधिक देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहेत.