PPE किट्स आणि टेस्टिंग किट्स केंद्र सरकारकडून पुरवले जाणार पण अपेक्षेप्रमाणे पुरवठा नाही- बाळासाहेब थोरात
मात्र तरीही केंद्राकडून अपेक्षेप्रमाणे पुरवठा होत नाही हे दुर्दैव असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे जाहीर केले आहे. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात लॉकडाउनचे नियम अधिक कठोर केले जाणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहेत. नागरिकांना मात्र अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जाणार आहेत. दुसऱ्या बाजूला डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. याच पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने पीपीई किट्स आणि टेस्टिंग किट्स पुरवले जाणार असा निर्णय घेतला आहे. मात्र तरीही केंद्राकडून अपेक्षेप्रमाणे पुरवठा होत नाही हे दुर्दैव असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
राज्यात कोरोनाबाधित असून प्रत्येक रुग्णासाठी दीड किट असा हिशोब आहे. मात्र दिवसाला फक्त चार हजार किट्स मिळत असल्यास पुरणारच नाही. या व्यतिरिक्त राज्यात नव्या रुग्णांच्या खोकला, ताप असे आजार तपासणीसाठी येातात त्यावेळी सुद्धा पीपीई किट्सची गरज भासते. तसेच डॉक्टरांची सुरक्षा लक्षात घेता पीपीई किट्सची अत्यावश्यकत आहे. त्यामुळे राज्य सरकारला केंद्र सरकारकडून खुप अपेक्षा आहेत असे ही बाळासाहेब थोरात यांनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.(Lockdown च्या दुसऱ्या टप्प्यात रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक बंदच; 20 एप्रिल पासून 'या' उद्योगांना मिळणार परवानगी- उपमुख्यमंत्री अजित पवार)
दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजाराच्या पार गेला आहे. तर रा्ज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्राची ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर आता येत्या 20 एप्रिल पासून नॉन हॉटस्पॉट ठिकाणी सरकारकडून काही गोष्टी सुरु करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.