धक्कादायक! मुंबईतील राजावाडी रुग्णालयात जागेची कमतरता असल्यामुळे 63 वर्षीय COVID-19 पॉझिटिव्ह वृद्ध महिलेला रस्त्यावर काढावी लागली रात्र

एका 63 वर्षीय कोविड-19 (COVID-19) संक्रमित वृद्ध महिलाने राजावाडी रुग्णालयात जागा न मिळाल्याने अख्खी रात्र रस्त्यावर काढावी लागली.

Coronavirus in India (Photo Credits: IANS)

कोरोना सारख्या महाभयाण विषाणूशी लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या कोरोना महाराष्ट्रात हाहाकार माजविला असून दिवसागणिक कोरोना रुग्णाची संख्या देखील वाढत चालली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना संक्रमितांची संख्या असलेल्या मुंबईत तर खूपच भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. टाईम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तानुसार एका 63 वर्षीय कोविड-19 (COVID-19) संक्रमित वृद्ध महिलाने राजावाडी रुग्णालयात जागा न मिळाल्याने अख्खी रात्र रस्त्यावर काढावी लागली. या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण असल्याने येथे जागेची कमतरता होती. त्यामुळे त्या महिलेला रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच ती राहत असलेली पवई येथील बिल्डिंग सील करण्यात आली. त्यातच तिला राजावाडी रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसल्यामुळे आपल्या घराजवळील रस्त्यावर रात्र काढावी लागली. सकाळी मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांनी तिला राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र तिथे जागा नसल्याने तिला रविवारी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले. Lockdown: बाहेर जातो नाही, घरी येतो म्हणा: महाराष्ट्र पोलीस

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेल्या कुटूंबातील आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेवरुन स्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येईल. त्यामुळे घरातून बाहेर पडून नका असा सल्ला प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे.

Mumbai Lockdown : लॉकडाऊन मध्ये अस सजले दादर रेल्वे स्टेशन ; आर्टिस्ट सूरज ओझा ची कमाल - Watch Video 

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या 12,974 पोहोचली असून एकट्या मुंबईतच 7,500 कोविड-19 बाधित रुग्ण आहेत. तर भारतात आतापर्यंत 42,533 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.