Coronavirus रुग्णसंख्या: महाराष्ट्र, भारत आणि संपूर्ण जग, सकाळी 10 वाजेपर्यंतची MEDD द्वारा प्राप्त आकडेवारी

एमइडीडी (MEDD ने आज सकाळी 10 वाजेपर्यंतची राज्य, देश आणि जगभरातील आकडेवारी आणि त्याबाबतचा अहवाल प्रसारित केला आहे. तो अहवाल काय सांगतो पाहा.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारत आणि जगातही कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचे आव्हान अद्याप कायम आहे. कोरोना व्हायरस संकटावर उपाय तर सोडाच परंतू त्यावर स्थिरता मिळविण्यावरही अद्याप यश येताना दिसत नाही. जगभरातील संशोधत कोरोना व्हायरसवर लस, औषध शोधण्यावर काम करत आहेत. राज्य, देश आणि जगभरातून कोरोना व्हायरसबाबत आकडेवारी येत आहे. जी जितकी धक्कादायक आहे तितकीच नागरिक म्हणून आपल्यावरील जबाबदारी वाढवणारीही आहे. महाराष्ट्र सरकार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (Medical Education and Drugs Departmen) द्वारा प्राप्त अहवालही हेच सांगतो. एमइडीडी (MEDD ने आज सकाळी 10 वाजेपर्यंतची राज्य, देश आणि जगभरातील आकडेवारी आणि त्याबाबतचा अहवाल प्रसारित केला आहे. तो अहवाल काय सांगतो पाहा.

एकूण रुग्ण

सकाळी 10 वाजेपर्यंत राज्यातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या महाराष्ट्रात 5229, भारतात 19995 आणि संपूर्ण जगात 2397216 इतकी आहे.

नवे रुग्ण

सकाळी 10 वाजेपर्यंत राज्यातील कोरोना व्हायरस नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात 553, भारतात 1384 आणि संपूर्ण जगात 83006 इतकी आहे.

मृत्यू झालेले रुग्ण

सकाळी 10 वाजेपर्यंत राज्यातील कोरोना व्हायरस बाधित मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात 251, भारतात 640 आणि संपूर्ण जगात 162956 इतकी आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अहवाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

गेल्या काही तासातील मृतांची संख्या

सकाळी 10 वाजेपर्यंत राज्यातील कोरोना व्हायरस बाधित गेल्या काही तासांत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात 19, भारतात 50 आणि संपूर्ण जगात 5109 इतकी आहे. (हेही वाचा, Coronavirus In Maharashtra: राज्यात 24 तासामध्ये वाढले 553 नवे कोरोनाबाधित; एकूण COVID 19 रूग्णांची संख्या 5229 वर)

Table | Photo Credits: MEDD)

दरम्यान, महाराष्ट्रातील रुग्णसंख्या विचारात घेताना त्याला दुसरीही एक बाजू आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात कोरोना व्हायरसबाबत केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे प्रमाणही अधिक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना व्हायरसबाबत अधिकाधिक चाचण्या होत आहेत. तसेच, महाराष्ट्र हे भारतातील एक सर्वात विकसित आणि अग्रेसर राज्या आहे. तसेच राज्याती आर्थिक राजधानी मुंबई हीसुद्धा महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे या राज्याचा आंतरराष्ट्रीय संपर्कही मोठ्या प्रमाणावर आहे.