Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला फोन
काल (शनिवार) दुपारपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 26 इतकी होती. पिंपरी चिंचवड येथील आणखी 5 नव्या रुग्णांची कोरोना व्हायरसबाबतची चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे पुणे शहरातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 15 तर राज्यातील संख्या 31 वर पोहोचली.
कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी फोनच्या माध्यमातून संवाद साधला. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील आणि देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या, नियंत्रण आणि एकूण परिस्थितीबाबत चर्चा झाली. राज्यात कोरोना व्हायरस बाधितांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. तरीही राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताच असल्याचे चित्र आहे.
आतापर्यंत राज्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 31 असल्याची अधिकृत माहिती आहे. काल (शनिवार) दुपारपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 26 इतकी होती. पिंपरी चिंचवड येथील आणखी 5 नव्या रुग्णांची कोरोना व्हायरसबाबतची चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे पुणे शहरातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 15 तर राज्यातील संख्या 31 वर पोहोचली. (हेही वाचा, Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ; औरंगाबाद येथील 59 वर्षीय महिलेला कोरोना व्हायरसची लागण)
कोरोना व्हायरसच्या रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या |
||
क्र | शहराचे नाव | रुग्णांची संख्या |
1 | पुणे | 15 |
2 | मुंबई | 05 |
3 | ठाणे | 01 |
4 | कल्याण | 01 |
5 | नवी मुंबई | 02 |
6 | नागपूर | 04 |
7 | यवतमाळ | 02 |
8 | अहमदनगर | 01 |
9 | औरंगाबाद | 01 |
एकूण | 32 |
एएनआय ट्विट
दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसमुळे व्यक्तीचे निधन झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. बुलढाणा येथील एका 75 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कोरोना व्हायरसुमळे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या वृत्ताबाबत माहिती देताना म्हटले की, बुलढाणा येथे एका 75 वर्षीय व्यक्तीचा मृत्या झाला ही बाब खरी आहे. मात्र, या वृद्धाचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळेच झाल्याची कोणतीही पुष्टी अद्याप झाली नाही. त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्या चाचणीचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.