Coronavirus: नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्यास लपून न बसता आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधावा, अजित पवार यांचे आवाहन
त्यामुळे नादगरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे दिसून आल्यास आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना दिले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचसोबत काही जणांना होम क्वारंटाइनचा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये क्वारंटाइनचा शिक्का हातावर असून ही नागरिक बाहेर फिरत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. दुसऱ्या बाजूला कोरोनाची लक्षणे असलेले काही जण त्याबाबत लपवणूक करत असल्याचे ही दिसून आले आहे. त्यामुळे नादगरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे दिसून आल्यास आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी नागरिकांना दिले आहे.
महाराष्ट्रातील सरकार कोरोनाच्या संकटाला दोन हात करण्यासाठी ठोस पावले उचचली जात आहेत. तसेच कोरोनाची राज्यातील परिस्थिती पाहून विविध नियमांची अंमलबजावणी सुद्धा केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांची काळजी घेण्याचे ही सांगण्यात येत असून त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देऊ नका असे ही बजावण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला आहे. त्यामुळे ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे किंवा संशयित रुग्णांनी लपून बसू नये असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्याचसोबत डॉक्टर किंवा पोलिसांसोबत गैरवर्तवणूक केल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सुद्धा नागरिकांना देण्यात आला आहे.(Coronavirus: महाराष्ट्रात लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1410 जणांना अटक तर 65 लाखाहून अधिक दंड वसूल)
तर कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउनचे आदेश दिल्यानंतर बहुसंख्य कामगार वर्गाने आपल्या घरची वाट पकडली आहे. अशा कामगारांनी स्थलांतरण करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. या कामगारांच्या राहण्यापासून ते आरोग्यापर्यंतची सर्व सुविधा राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तर कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुरु करण्यात आला असून त्यासाठी नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद दिला जात आहे.