Coronavirus: पालघर येथे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 379 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल
त्यामुळे पोलिसांकडून अशा नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर आता पालघर येथे सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकला गेलेल्या 379 नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम ठेवले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. तर नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. पण नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास परवानगी नाही आहे. तरीही काही ठिकाणी नागरिक सकाळच्या वेळेस काही ना काही कारणाने घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशा नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर आता पालघर येथे सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकला गेलेल्या 379 नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अत्यावश्यक वाहनांना पेट्रोल-डिझेल देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई आहे. तरीही सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकसाठी पडलेल्या नागरिकांच्या विरोधात आता कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यात संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) नुसार मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.(नागपूर: Coronavirus Lockdown दरम्यान नागरिकांमध्ये जागतिक आरोग्य संकटाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी उभारला कोरोनाचा प्रतिकात्मक पुतळा)
दरम्यान, पुणे येथे सुद्धा मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना अद्दल घडवत त्यांच्याकडून पोलिसांनी कसरती करुन घेतल्या. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजारांच्या पार गेला आहे. तसेच रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये राज्याची विभागणी करण्यात आली आहे. तर 20 एप्रिल पासून कोरोनाच्या नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी नियम शिथिल करण्याच निर्णय सरकारने घेतला आहे.