Coronavirus Outbreak: नागपूरमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची Breath-Analyser तपासणी थांबवली

कारण ही चाचणी करताना श्वसनाशी संबंध येतो. महाराष्ट्र राजमार्ग अतिरिक्त महानिदेशक (ADGP) विनय करगांवकर (Vinay Kargaonkar) यांनी यासंदर्भात सोमवारी परिपत्रक काढलं आहे.

Drunken driving (Photo Credits: Pixabay)

नागपूरमध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची Breath-Analyser तपासणी थांबवली आहे. कारण ही चाचणी करताना श्वसनाशी संबंध येतो. महाराष्ट्र राजमार्ग अतिरिक्त महानिदेशक (ADGP) विनय करगांवकर (Vinay Kargaonkar) यांनी यासंदर्भात सोमवारी परिपत्रक काढलं आहे.

या परिपत्रकानुसार, राज्यात कोरोना व्हायरसचे अनेक रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कोणताही पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी वाहन चालकाची Breath-Analyser तपासणी करणार नाहीत. करगांवकर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी पोलिस विभागाने हा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही तपासणी पुन्हा करण्यात येणार आहे. (हेही वाचा - Coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता शिर्डीचंं साई मंदिर, गजानन महाराज मठ देखील राहणार बंद)

जगभरात कोरोना व्हायरसमुळे मागील 24 तासात 600 हुन अधिक मृत्यू झाले आहेत. तसेच मुंबईत कोरोनाचा पहिली बळी गेल्याचंही आज समोर आलं आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या एका 64 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालायत कोरोनाचे तब्ब्ल 9 रुग्ण उपचार घेत आहेत. यापूर्वी भारतात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात 125 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात आज पर्यंत कोरोनाचे तब्बल 39 रुग्ण आढळले आहेत. यातील एकाचा आज मृत्यू झाला आहे.