Coronavirus Outbreak in Maharashtra: नागपूर मध्ये आजच्या दिवशी कोरोनाचे 9 नवे रुग्ण! जिल्ह्यातील Covid 19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 72

राज्याची उपराजधानी नागपूर येथे कोरोनाग्रस्त 9 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढता पाहायला मिळत आहे. राज्याची उपराजधानी नागपूर (Nagpur) येथे कोरोनाग्रस्त 9 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 72 वर पोहचली असल्याची माहिती जिल्हा माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात एकूण 3648 कोरोना बाधित रुग्ण असून 365 जण त्यातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. त्यामुळे सध्या 3072 कोरोना ग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 211 जणांचा कोरोना संसर्गाने बळी घेतला आहे.

राज्यात मुंबई, पुणे, ठाणे या भागात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तसंच या संख्येत सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. रुग्णसंख्येनुसार 3 झोन्समध्ये जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण आढळलेले जिल्हे रेड झोनमध्ये मोडत आहेत. त्यामुळे असे जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात आहेत. (नागपूर: कोरोनावर मात करुन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या एका व्यक्तीला घराबाहेर पडणे चांगलेच भोवले)

ANI Tweet:

कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तसंच रेड झोन मधील संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. दरम्यान कोरोनाचे हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी उद्यापासून म्हणजे 20 एप्रिल पासून काही उद्योगधंदे सुरु करण्यास कठोर अटींच्या आधारावर परवानगी देण्यात आली आहे.