Coronavirus Outbreak in Amravati: अमरावती जिल्ह्यात पुन्हा जमावबंदी, कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
त्यामुळे या आदेशांतर्गत नागरिकांना गर्दी करता येणार नाही. दरम्यान, संचारबंदी आदेस असले तरी सर्व दुकाने, सेवा आदी गोष्टी पूर्ववतपणेच सुरु असतील. वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Curfew in Amravati: कोरोना व्हायरस (Coronavirus Outbreak) संकट नियंत्रणात आणण्यासाठी जगभरात लसनिर्मीती सुरु आहे. भारतातही कोरोना लस निर्माण करण्यात आली असू,न प्रत्यक्ष लसीकरण मोहिमही राबविण्यात येत आहे. त्यामुळे देशातील आणि खास करुन महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात मात्र कोरोना व्हायरस पुन्हा डोके वर काढताना दिसतो आहे. अमरावती (Amravati ) जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा लक्ष्यवेधी वाढल्याने या जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केला आहे. प्राप्त माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू आहे.
अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तशी कमी होती. परंतू गेल्या काही काळापासून ही संख्या मोठ्या प्रमाणावर वढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गर्दी होऊन कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे संभाव्य प्रमाण टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासन आणि आरोग्य विभाग कामाला लागला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार अमरावती जिल्ह्यात येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू असेल. त्यामुळे या आदेशांतर्गत नागरिकांना गर्दी करता येणार नाही. दरम्यान, संचारबंदी आदेस असले तरी सर्व दुकाने, सेवा आदी गोष्टी पूर्ववतपणेच सुरु असतील. वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. (हेही वाचा, Covid-19 Vaccination in Maharashtra: महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 6,08,570 जणांना देण्यात आली कोविड-19 लस)
कसे असतील संचारबंदीत नियम?
- पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये.
- जिल्ह्यातील विद्यालये, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.
- धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवरही बंधणे असतील.
- अत्यावश्यक सेवा, दुकाने मात्र पूर्ववत सुरु राहतील.
दरम्यान, महाराष्ट्र आणि देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई शहरातही कोरोना व्हायरस संक्रमितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. परंतू, लॉकडाऊन शिथिलता दिल्यानंतर दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढले. नागरिकांनी प्रवास करणे सुरु केले. परिणामी कोरोनाची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे.