Coronavirus: 'काही टेंशन घेऊ नको रे, मित्रा!' Corona Warrior परत आलायं; COVID-19 संक्रमित मुंबई पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त

हा कर्मचारी उपचारानंतर ठणठणीत बरा होऊन परतत आहे. मुंबई पोलिसानी या कोविड योध्याला घेण्यासाठी खास वाहन पाठवले होते. इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

Corona Warrior | (Photo Credits :Twitter/@MumbaiPolice)

डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नांनंतर आणखी एका मुंबई पोलीस (Mumbai police) कर्मचाऱ्याने कोरना व्हायरस संकटावर मात केली आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या @MumbaiPolice या टविटर हँडलवरुन या जवानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे 'काही टेंशन घेऊ नको रे, मित्रा!' Corona Warrior परत आलायं, अशी भावना मुंबई पोलिसांमध्ये निर्माण झाली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. तेव्हा त्याला उपचारासाठी घेऊन जातानाचा व्हिडिओही मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता. त्या वेळीही 'काही टेंशन घेऊ नको रे, मित्रा!' असे म्हणत मुंबई पोलिसांनी आपल्या सहकाऱ्याला भावनिक आधार दिला होता.

दरम्यान, नव्याने शेअर केलेल्या व्हिडिओत मुंबई पोलीसांनी या कर्मचाऱ्याचे वर्णन Corona Warrior असा केला आहे. हा कर्मचारी उपचारानंतर ठणठणीत बरा होऊन परतत आहे. मुंबई पोलिसानी या कोविड योध्याला घेण्यासाठी खास वाहन पाठवले होते. इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

Corona Warrior परतल्यावर मुंबई पोलिसांचे ट्विट

मुंबई पोलिसांनी 29 एप्रिल 2020 या दिवशी आपल्या @MumbaiPolice ट्विटर हँडलवरुन शेअर केलेला हा व्हिडिओ राज्याचे पर्यावरण मंत्री (Environment Minister) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये दिसत होते की, या पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णवाहीकेतून उपचारासाठी घेऊन जात असताना मुंबई पोलीस दलातील त्याचे सहकारी त्याला निरोप देतात. या वेळी 'काही टेंशन घेऊ नको रे, मित्रा!' तुझ्या पाठिमागे आम्ही खंबीर उभे आहोत, असे सांगत हे सहकारी त्याला भावनिक साद घालतात. (हेही वाचा,Coronavirus: 'काही टेंशन घेऊ नको रे, मित्रा!' COVID-19 पॉझिटीव्ह सहकाऱ्याला जेव्हा Mumbai Police देतात भावनिक आधार; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शेअर केला व्हिडिओ )

Corona Warrior उपचारासाठी जात असतानाचे ट्विट

महाराष्ट्र पोलीस दलातील बरेच कर्मचारी कोरोना व्हायरस संक्रमित झाले आहेत. नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमनापासून दूर ठेवण्यासाठी आणि लॉकडाऊन नियमांचे पालन व्हावे यासाठी महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत. यात मुंबई पोलिसांवरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. दाटीवाटीची लोकवस्ती, दमट हवामान, छोट्या घरांमध्ये राहणाऱ्यांची मोठी संख्या आदींमुळे नागरिकी घराबाहेर पडत आहेत. बाजारात गर्दी करत आहेत. अशा वेळी पोलिसांना गर्दीत जाऊन काम करावे लागते आहे.