IPL Auction 2025 Live

Corona Vaccination In Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अदर पुनावाला यांच्यात ऑनलाईन बैठक, महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणाबात चर्चा

दरम्यान, या बैठकीवेळी कोरोना लस दराबाबत मात्र कोणताही चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात कोरोना लसीकरण (COVID 19 Vaccination in Maharashtra) मोहिमेदरम्यान सुमारे 8.5 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Corona Vaccination in Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute of India) अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांच्यात एक ऑनलाईन बैठक पार पडली. येत्या 1 मे 2021 पासून महाराष्ट्रात 18 ते 45 वर्षे या वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्या अनुशंघाने या बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्र कोरोना लसीकरण (Corona Vaccination in Maharashtra) मोहिम कशा पद्धतीने राबवता येईल. सीरम इन्स्टिट्यूट महाराष्ट्राला कोविशिल्ड (Covishield Vaccine ) लसीचे किती डोस पुरवू शकेल यावर प्रामुख्याने चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीवेळी कोरोना लस दराबाबत मात्र कोणताही चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात कोरोना लसीकरण (COVID 19 Vaccination in Maharashtra) मोहिमेदरम्यान सुमारे 8.5 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या कोरोना लसींच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्रात सुमारे 1.2 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर साधारण 15 लाख नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. सीरम इन्स्टिट्यूटतर्फे महाराष्ट्राला कोविशिल्ड लसीचे डोस मिळाले तर ते अधिक फायदेशीर ठरणार आहे. करण, सीरम इन्स्टिट्यूटचा प्लांट महाराष्ट्रात पुणे येथे आहे. त्यामुळे राज्याची कोरोना लस वाहतुकीवरील ताण कमी होऊ शकतो. (हेही वाचा, Coronavirus: सरकारी दवाखन्यांसाठी Covishield लस 400 रुपयांना खासगी रुग्णालयांना 600 रुपयांत; Serum Institute कडून दरपत्रक जारी)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरस लसीकरण मोहिम अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच एक बैठक घेणार आहेत. दुसऱ्या बाजूला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही म्हटले आहे की, इंग्लंडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही काम केले जाणार आहे. त्यासाठी राज्यातील इतर विविध विभाग, खात्यांचा निधी कपात करुन तो थेट आरोग्य विभागाकडे वळवला जाणार आहे. या निधीतून व्यापक स्तरावर कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येईल, असे टोपे यांनी म्हटले आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने कालच (22 एप्रिल) लसीबाबतचे एक दरपत्रक जारी केले आहे. त्यानुसार राज्य सरकारांना कोरोना लस ही 400 रुपये प्रती डोस तर खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रती डोस दराने दिली जाणार आहे. तर केंद्र सरकारला मात्र 150 रुपये प्रती डोस या दराने ही लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. जगभरातील कोरोना लसींच्या तुलनेत भारतातील कोरोना लस ही कमी दरात उपलब्द असल्याचेही सीरमने म्हटले आहे.