Coronavirus: ओला कंपनीची आता मुंबई महापालिका सोबत भागीदारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मदत करणार
याच पार्श्वभुमीवर ओला कंपनीने (OLA Company) मुंबई महापालिकेसोबत (Mumbai BMC) भागीदारी केली आहे. त्यानुसार खासगी वाहतूक सेवा असणारी ओला कंपनी आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची मदत करणार आहे.
महाराष्ट्रसह देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असल्याचे ही जाहीर करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी दिवसरात्र सध्याच्या परिस्थितीत काम करत आहेत. वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स हे मिळून कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात यशस्वीरित्या लढा देत आहेत. ऐवढेच नाही तर राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभुमीवर ओला कंपनीने (OLA Company) मुंबई महापालिकेसोबत (Mumbai BMC) भागीदारी केली आहे. त्यानुसार खासगी वाहतूक सेवा असणारी ओला कंपनी आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची मदत करणार आहे.
ओला कंपनीने एका विधानात असे म्हटले आहे की, महापालिकेसोबत आम्ही भागीदारी केली आहे. जेणेकरुन अत्यावश्यक सेवांमधील मेडिकल संदर्भातील प्रवासाठी त्यांनी ही सुविधा खासकरुन सुरु केली आहे. तर महापालिकेकडून शहरातील प्रत्येक विभागातील वैद्यकिय कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ यांच्या नेण्याआणण्यासाठी ओला कंपनीच्या कार आता सेवा पुरवणार आहेत.(Lockdown: LUDO खेळाचे उदाहरण देत ठाणे पोलिसांचा हटके संदेश, 'जी सोंगटी घरात राहील ती सुरक्षित राहील')
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 2801 वर पोहचला आहे. यामध्ये मुंबई, पुणे आणि अन्य राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. तर केंद्र सरकारने येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.