Coronavirus: काही तासात महाराष्ट्रात COVID 19 बाधित रुग्णांची संख्या 60 ने वाढली; राज्यात कोरोना बाधित एकूण 1078
मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांतच 60 नव्या रुग्णांची नोंद होऊन महाराष्ट्र तब्बल 1078 वर पोहोचला आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट महाराष्ट्रात अधिक गहीरे होऊ लागले आहे. ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील कोरना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 1078 वर पोहोचली आहे. यात कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या 60 नव्या रुग्णांचाही समावेश आहे. एकट्या मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत 44 नव्या रुग्णांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. याशिवाय पुणे 9, नागपूर 4, आणि अहमदनगर, अकोला, बुलढाणा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्रालयाने काल (7 एप्रिल 2020) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 1018 इतकी होती. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांतच 60 नव्या रुग्णांची नोंद होऊन महाराष्ट्र तब्बल 1078 वर पोहोचला आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोना व्हायरस लागण झालेल्या 2 रुग्णांचा आज (8 एप्रिल 2020) मृत्यू झाला आहे. त्यातील एका व्यक्तिस मधुमेहाचा आजार होता. तो केवळ 44 वर्षांचा होता. दुसऱ्या रुग्णाबाबत तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. (हेही वाचा, पुणे: ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू; शहरातील Covid 19 मुळे बळींचा आकडा 10 वर)
एएनआय ट्विट
दरम्यान, 773 नव्या रुग्णांसह देशातील COVID-19 बाधितांची संख्या तब्बल 5194 वर पोहोचली आहे. त्यातील 401 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, आतापर्यंत कोरोना बाधित तब्बल 149 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस बाधितांची एकूण संख्या 4643 इतकी आहे.