IPL Auction 2025 Live

Coronavirus: महाराष्ट्र परिवहन सेवा बंद करण्याचा निर्णय नाही: परिवहन मंत्री अॅड. अनिल परब

डेपोत असलेल्या सर्व एसटी बसेस सकाळ संध्याकाळ स्वच्छ धुण्याच्या सूचना सर्व आगार व्यवस्थापक (डेपो मॅनेजर) यांना देण्यात आल्या आहेत. बसमध्ये सॅनिटायजर उपलब्ध करुन दिले जात आहेत. तसेच, बसमध्ये एका सीटवर एकच प्रवासी प्रवास करेन अशीही व्यवस्था केली जात असल्याची माहिती अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.

MSRTC Bus | (File Image)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे. सर्व आघाड्यांवर काम सुरु आहे. मात्र, राज्यातील परिवहन सेवा बंद (Maharashtra Transport Service) ठेवण्याचा निर्णय अद्याप तरी घेण्यात आला नाही. बस सेवा बंद न करता आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही करत आहोत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब (State Transport Minister Adv.Anil Parab) यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी पंजाब सरकारने परिवहन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही असा निर्णय घेणार का? असा सवाल अॅड. परब यांना विचारण्यात आला होता. या वेळी परब हे उत्तरादाखल बोलत होते.

या वेळी बोलताना अनिल परब यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्याचा परिवहन विभाग जोरदार कार्य करतो आहे. डेपोत असलेल्या सर्व एसटी बसेस सकाळ संध्याकाळ स्वच्छ धुण्याच्या सूचना सर्व आगार व्यवस्थापक (डेपो मॅनेजर) यांना देण्यात आल्या आहेत. बसमध्ये सॅनिटायजर उपलब्ध करुन दिले जात आहेत. तसेच, बसमध्ये एका सीटवर एकच प्रवासी प्रवास करेन अशीही व्यवस्था केली जात असल्याची माहिती अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस प्रतिंबधीत व्हावा यासाठी पंजाब सरकारने सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत खासगी बस, ऑटो रिक्षा, टेम्पो, ट्रक वाहतूकीवरही निर्बंध घातले आहेत. पंजाब सरकारच्या निर्णयाची शुक्रवारी रात्रीपासून अंमलबजावणी सुरु आहे. यासोबतच राज्यात किंवा घराबाहेर पडलेल्या नागरिकांना आपापल्या घरी लवकरात लवकर पोहोचण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी उद्यापर्यंतची वेळही ठरवून देण्यात आली आहे. पंजाब सरकारने कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी मंत्रिमंडळाची एक बैठक बोलावली होती. या वेळी हा निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा, Coronavirus Outbreak In Mumbai: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वरील एसी लोकल उद्या पासुन 31 मार्च पर्यंत रद्द)

दरम्यान, पंजाब सरकारने घेतलेल्या निर्णयासारखा निर्णय महाराष्ट्र सरकारही घेणार का अशी चर्चा सुरु होती. त्यावर अद्याप तरी असा निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.