Coronavirus: राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन राहण्याचा घेतला निर्णय; कारण घ्या जाणून
ज्यामुळे संपूर्ण राज्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित (COVID19) रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ज्यामुळे संपूर्ण राज्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने खबरदरीचा उपाय म्हणून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी होम क्वारंटाईन (Home Quarantine) राहण्याच्या निर्णय घेतला आहे. 1 जून ते 4 जून या कालावाधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या 2 राजकीय नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही बातमी समजल्यानंतर अमोल कोल्हे यांनी तात्काळ स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली आहे. सुदैवाने त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत.
अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून महत्वाची माहिती शेअर केली आहे. दरम्यान, ते म्हणाले आहेत की, एक जुलै ते चार जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. हे समजल्यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे. मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून मी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विकासकामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही. काही अडचण असल्यास आपण मला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालय मध्ये संपर्क करू शकता, अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे. हे देखील वाचा- पारनेर: बाण भात्यात परतले; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या 'त्या' 5 नगरसेवकांची पुन्हा शिवसेना वापसी
अमोल कोल्हे यांचे ट्विट-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह' याठिकाणी काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करून नुकसान केली आहे. याबाबतही अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त करत राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. राजगृह अनेकांचे प्रेरणास्थान आहे,जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात, असेही ते म्हणाले आहेत.