Coronavirus: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पूर्णपणे बंद, राज्यात संचारबंदी लागू होण्याची शक्यता
काल दिवसभर कर्फ्यू मुळे निर्माण झालेले वातावरण क्षणार्धात अंत पावले. विशेष म्हणजे खासगी कंपन्या, दुकाने, सर्व काही बंद आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुविधा सुरु आहेत. असे असताना इतक्या मोठ्या संख्येने लोक नेमके कोठे निघाले आहेत, हे मात्र कोणालाच कळत नव्हते.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. कोरोना व्हायर (Coronavirus) संकट नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील जनताही त्याला अपेक्षीत सहकार्य करत आहे. काही उपद्वापी लोक मात्र, कराणाशिवाय रस्ते, चौक आणि विविध ठिकाणी गर्दी करत आहेत. जमावबंदी (Curfew) आदेश लागू करुनही लोक ऐकत नाहीत. त्यामुळे ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार राज्यात संचारबंदी (Communication Block) लागू करण्याबाबत विचार करत आहे. पोलिसांनी विनंत्या करुनही नागरिक रस्त्यांवर येत असल्याने कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांना अडथळा निर्माण होत आहे.
कोरोना व्हायरस नियंत्रणात आणत असताना केंद्र, राज्य सरकारचे जे कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलीस, ज्ञात अज्ञात लोकांकडून जे काम केले जात आहे त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी रविवारी (22 मार्च 2020) जनता कर्फ्यू आयोजित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे अवाहन केले होते. तसेच, त्या दिवशी सायंकाळी 5 वाजता ताट, पितळ्या वाजवून किंवा घंटानाद करुन अथवा टाळ्या वाजवण्याचे अवाहनही त्यांनी केले होते. लोकांना या अवाहनाचा अर्थच कळला नाही. हा सर्व प्रकार घरात राहून करायचा होता. पण लोक रस्त्यांवर उतरले, गर्दी केली, काही महाभागांनी तर गरबा खेळला. या प्रकारामुळे दिवसभर पाळलेल्या कर्फ्यूचे गांभीर्य निघून गेले.
आज सकाळीही मुंबई आणि पुण्यातील टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. काल दिवसभर कर्फ्यू मुळे निर्माण झालेले वातावरण क्षणार्धात अंत पावले. विशेष म्हणजे खासगी कंपन्या, दुकाने, सर्व काही बंद आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुविधा सुरु आहेत. असे असताना इतक्या मोठ्या संख्येने लोक नेमके कोठे निघाले आहेत, हे मात्र कोणालाच कळत नव्हते. (हेही वाचा, Coronavirus: मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये अन्यथा पोलिसांकडून कारवाई करावी लागेल- आरोग्यमंत्री राजेश टोपे)
ट्विट
ट्विट
दरम्यान, काही लोकप्रतिनिधिंनीही प्रत्यक्ष रस्त्यांवर उतरुन पाहणी केली. लोक कारणाशिवाय रस्त्यांवर फिरताना आढळले. त्यामुळे या लोकप्रतिनिधिंनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यात संचारबंदी लागू करावी अशी मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांना टॅग करुन म्हणले आहे की, ''@OfficeofUT तुमच्या कामाची प्रशंसा होते आहे पण काही जण गंभीर नाहीत खालचे फोटो बघा. संकट किती भयंकर आहे ह्याची कल्पना काही लोकांना नाही. लॉक डाउन ने भागेल असे वाटत नाही. संचार बंदी लागू करा.''