Coronavirus: मुंबई महापालिका कोरोना व्हायरस आतापर्यंतचे सर्व अपडेट्स; पाहा COVID 19 चा तपशील
तर, पुणे येथील अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर ठिकाणची चित्रपटगृहे, यात्रा, उरुस यांवरही बंदी घालण्यात आली आहे.
Mumbai Municipal Corporation Coronavirus updates: मुंबई महापाकेने (Mumbai Municipal Corporation) आज अखेर (15 मार्च 2020) पर्यंतची कोरोना व्हायरस (Coronaviru) बाबतची तपशीलवार आणि सखोल माहिती दिली आहे. यात आतापर्यंत कोरोना व्हायरस बाधित किती व्यक्तींची चाचणी घेण्यात आली. त्यातील किती जणांची सीओव्हीआयडी-19 (COVID 19) चाचणी पॉझिटिव्ह आली. आता सध्या किती रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातीली रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या किती आहे. यांसर इतर तपशीलही मुंबई महापालिकेने दिला आहे.
मुंबई महापालिका अंतर्गत कोरोना व्हायरस रुग्ण आणि तपशीलवार माहिती (दुपारी 12 पर्यंतची)
मुंबई महापालिका अंतर्गत कोरोना व्हायरस रुग्ण आणि तपशीलवार माहिती (दुपारी 12 पर्यंतची) | ||
1 | कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल एकूण संशयीत | 418
|
2 | कोरोना व्हायरस चाचणी निगेटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या | 334 |
कोरोना व्हायरस चाचणी अहवाल प्रलंबीत | 75 | |
3 | कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या (14 मार्च 2020 पर्यंत) | 5 (मुंबई),
4 (मुंबईबाहेर) |
4 | दि. 15 मार्च 2020 पर्यंत एकूण नमूण्यांची चाचणी | 43 |
5 | दि. 15 मार्च 2020 पर्यंत एकूण नमूण्यांची पॉझिटिव्ह चाचणी | 0 |
6 | दि. 15 मार्च 2020 पर्यंत एकूण नमूण्यांची निगेटिव्ह चाचणी | 43 |
दरम्यान, कोरोना व्हायरसचा धोका विचारात घेऊन राज्यातील सर्व प्रकारचे शासकीय, धार्मिक आणि राजकीय तसेच स्थानिक पातळीवर साजरे केले जाणाऱ्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नये. त्याबाबत सक्त सुचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. मात्र नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: पुणे शहरात मॉल बंद; पुणेकरांसाठी सूचक नियमावली)
कोरोना व्हायरसच्या रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या |
||
क्र | शहराचे नाव | रुग्णांची संख्या |
1 | पुणे | 16 |
2 | मुंबई | 05 |
3 | ठाणे | 01 |
4 | कल्याण | 01 |
5 | नवी मुंबई | 02 |
6 | नागपूर | 04 |
7 | यवतमाळ | 02 |
8 | अहमदनगर | 01 |
9 | औरंगाबाद | 01 |
एकूण | 32 |
मुंबई महापालिका ट्विट
दरम्यान, मुंबई, पुणे शहरांतील मॉल्स, जलतरण तलाव, व्यायामशाळा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर, पुणे येथील अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर ठिकाणची चित्रपटगृहे, यात्रा, उरुस यांवरही बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबई शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पुणे शहरातही आवश्यकता भासल्यास जमावबंदी लागू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.