Coronavirus: मुंबई लोकल प्रवासासाठी मनसे उद्या करणार 'सविनय कायदेभंग', आंदोलनास आणखी एका संस्थेचा पाठींबा
तरीही हे नेते सविनय कायदेभंग करण्यावर ठाम आहेत. मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनास उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं (महासंघ) पाठिंबा दिला आहे.
लॉकडाउन (Lockdown) लागू करुन आणि लोकल सेवा बंद करुनही मुंबईत कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. शहरात ज्या बसेस सुरु आहेत त्यातूनही मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होत आहे. सोशल डिस्टन्सींगचे कोणत्याही प्रकारे पालन होत नाही. गर्दीच पाहायला मिळते. मग असे असताना मुंबई लोकल (Mumbai Local) प्रवास केल्यानंतरच कोरोना पसरतो हे कशावरुन, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्मान सेना (MNS) या पक्षाने सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सविनय कायदेभंग (Savinay Kaydebhang) करत मनसे उद्या मुंबई लोकलने प्रवास करणार आहे. दरम्यान, मनसेच्या काही नेत्यांना रेल्वे पोलिसांनी आगोदरच नोटीस बजावली आहे. तरीही हे नेते सविनय कायदेभंग करण्यावर ठाम आहेत. मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनास उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं (महासंघ) पाठिंबा दिला आहे.
मनसे सरचिटणीस यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई बेस्ट आणि उपनगरांतून तसेच नवी मुबईतून धावणाऱ्या विविध बसेसचे व्हिडिओ सोशल मीडियारुन शेअर केले होते. हे व्हिडिओ शेअर करत देशपांडे यांनी जर बेस्ट बसने प्रवास करताना कोरोना होत नाही. तर मग मुंबई लोकलने प्रवास केल्यावर कोरोना कसा नाही होत, असा सवालही देशपांडे यांनी उपस्थित केला होता. (हेही वाचा, Western Railway Special Suburban Train: मुंबईतील नागरिकांच्या सेवेसाठी 350 ऐवजी 500 गाड्या येत्या 21 सप्टेंबर पासून धावणार, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय)
दरम्यान, मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनास उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं (महासंघ) पाठिंबा दिला आहे. मनसेला पाठींबा देताना या संस्थेने म्हटले आहे की, अत्यावश्यक सेवा आणि इतर काही कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतू, अद्यापही सर्वासामन्य नागरिकांना प्रवास करण्यास परवानगी दिली नाही. सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासाचा प्रश्न सुटलाच नाही. रिक्षा, टॅक्सी व अन्य पर्याय लोकांना परवडणारे नाहीत. बेस्ट बस सेवेवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे आपण मनसेच्या कायदेभंगास आपण पाठिंबा देत असल्याचे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं (महासंघ) म्हटले आहे.
लोकल प्रवास हा मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकाची गरज आहे. मुंबई रेल्वे थांबली तर अवघे शहर ठप्प झाल्याचे चित्र निर्माण होते. त्यामुळे लॉकडाऊन काळ संपून आता अनलॉक प्रक्रिया सुरु होत आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी आणि तितकीच आवश्यक असलेली मुंबई लोकल लवकर सुरु व्हावी अशी जनभावना तयार होऊ लागली आहे.