IPL Auction 2025 Live

Coronavirus: आयर्लंडचे मराठी वंशाचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभारासाठी फोन

लिओ वराडकर यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. दोन्ही नेत्यांमध्ये बुधवारी (22 एप्रिल 2020) फोनद्वारे चर्चा झाली. वराडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “करोना व्हायरसमुळे आयर्लंड आणि भारतावर होणाऱ्या परिणामांबाबत आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली”.

Narendra Modi and Leo Varadkar | Ireland PM Dr. Leo Varadkar and Prime Minister Narendra Modi

आयर्लंडचे (Ireland) पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर (Dr. Leo Varadkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना फोन करुन आभार मानले आहेत. महत्त्वाचे म्हणजे डॉ. लिओ वराडकर हे मूळचे भारतीय आणि त्यातही मराठी वंशाचे (Marathi Descent) आहेत. कोरना व्हायरस संकट आणि या संकटाचा सामना करताना आयर्लंडमधील भारतीय कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल डॉ वराडकर यांनी आभार मानले. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट नियंत्रणाबद्दल उभय नेत्यांमध्ये या वेळी चर्चा झाली.

डॉ. लिओ वराडकर यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. दोन्ही नेत्यांमध्ये बुधवारी (22 एप्रिल 2020) फोनद्वारे चर्चा झाली. वराडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “करोना व्हायरसमुळे आयर्लंड आणि भारतावर होणाऱ्या परिणामांबाबत आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली”. दरम्यान, या चर्चेवेळी आपण आयर्लंडमध्ये आरोग्य सेवेत भारतीय कर्मचारी देत असलेल्या योगदानाबद्दल आपण आभार मानल्याचेही वराडकर यांनी म्हटले आहे. तसेच, फार्मा आणि औषध क्षेत्रात उभय देशांनी एकमेकांना सहकार्य करावे अशीही चर्चा या वेळी करण्या आल्याचा उल्लेख वराडकर यांनी ट्विटमध्ये केला आहे.

डॉ. लिओ वराडकर ट्विट

लिओ वराडकर हे स्वत: पेशाने डॉक्टर आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरस संकटादरम्यान ते आपल्या पदाची जबाबदारी सांभाळत पुन्हा एकदा डॉक्टरी पेशात शिरले आहेत. त्यांनी रुग्णसेवेत स्वत:ला झोकून दिले आहे. (हेही वाचा: Coronavirus मुळे 154 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान; लैंगिक अत्याचार, अकाली गर्भधारणा, बाल विवाहाचे प्रमाण वाढण्याचा धोका- UNESCO)

पीएम मोदी ट्विट

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करुन आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांच्यासोबत चर्चा झाल्याचे तसेच आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी अधिक मजबूत करुन करोना संकट संपल्यानंतरच्या आव्हानांचा एकत्र सामना करण्याबाबत चर्चा झाल्याचे म्हटले आहे.