IPL Auction 2025 Live

Maharashtra’s Recovery Rate: महाराष्ट्रासाठी शुभसंकेत! राज्यातील रिकव्हरी रेट आता 85.65 टक्क्यांवर

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्य गेल्या सात महिन्यांपासून कोरोना संकटाशी लढा देत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्याला मात देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

Coronavirus: कोरोनाने महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात थैमान घातले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्य गेल्या सात महिन्यांपासून कोरोना संकटाशी लढा देत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्याला मात देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यामुळे राज्यातील कोरोनामुक्तांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे समजत आहे. राज्यात आज तब्बल 14 हजार 238 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या 13 लाख 38 हजार 321 वर पोहचली असून राज्यातील रिकव्हरी रेट आता 85.65 टक्क्यावर पोहचला आहे.

महाराष्ट्र गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. मात्र, राज्यात अनलॉकच्या अंतर्गत लॉकडाऊनच्या अनेक निर्बंधाना शिथिलता देण्यात सुरुवात झाली आहे. राज्यातील बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. यामुळे लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणींना सामोर जावा लागणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. या काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. हे देखील वाचा- Blood Bank In Mumbai: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! पुढील 5-6 दिवसांसाठी रक्तपुरवठा शिल्लक

राजेश टोपे यांचे ट्विट-

 महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 15 लाख 86 हजार 321 आहे. त्यात 13 लाख 38 हजार 606 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 85 हजार 270 करोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 41 हजार 965  रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.