महाराष्ट्रात 20 एप्रिल पासून शिथील करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये 'प्रिंट मिडीया' चाही समावेश; वर्तमानपत्र, मासिक घरोघरी वितरणावर निर्बंध
परंतु वर्तमानपत्र, मासिक घरोघरी जाऊन वितरण करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
देशभराहसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन देशभरात येत्या 3 मे पर्यंत कायम असणार आहे. मात्र येत्या 20 एप्रिल पासून काही सुविधा नागरिकांसाठी सुरु करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर सरकारने नुकतीच मार्गदर्शक सूचना जाहिर करण्यात आल्यानंतर त्यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या सुधारणेनुसार, येत्या 20 एप्रिल पासून प्रिंट मिडियाला (Print Media) सूट देण्यात आली आहे. परंतु वर्तमानपत्र, मासिक घरोघरी जाऊन वितरण करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. मात्र जनतेची अडचण पाहता येत्या 20 एप्रिल पासून काही बाबती नियम शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासंबंधित एकत्रित मार्गदर्शक सुचना 17 एप्रिलला जाहीर करण्यात आली होती. मात्र आता त्यामध्ये सुधारणा करत राज्यातील प्रिंट मीडियाला टाळेबंदीतून वगळण्यात आले आहे. त्याचसोबत मंत्रालयीन सर्व विभागांच्या आयुक्तालयातील आयुक्त, संचालनालयातील संचालक यांनी 10 टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालयात उपस्थित रहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.(PPE किट्स आणि टेस्टिंग किट्स केंद्र सरकारकडून पुरवले जाणार पण अपेक्षेप्रमाणे पुरवठा नाही- बाळासाहेब थोरात)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजारांच्या पार गेला आहे. रेड झोनमध्ये मुंबई आणि पुणे यांचे नाव असून तेथील नियम शिथिल करता येणे अशक्य आहे. त्याचसोबत
राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्राची ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.