IPL Auction 2025 Live

Coronavirus: महाराष्ट्र पोलीस लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी CID आणि ACB यांची मदत घेणार

त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत. तर राज्य सरकारने लॉकडाउनचे (Lockdown) आदेश दिले असून नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जाणार आहेत.

Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत. तर राज्य सरकारने लॉकडाउनचे (Lockdown) आदेश दिले असून नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्याचसोबत नागरिकांनी घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करण्यात आले आहे. तरीही नागरिक मोठ्या प्रमाणात विनाकारण घराबाहेर पडत आहे. दुसऱ्या बाजूला लॉकडाउनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात अंमलबाजवणीसाठी पोलिसांची फौज कमी पडत असल्याने आता अधिक मनुष्यबळाची मदत घेणार आहेत. यासाठी एसीबी (ACB) आणि सीआयडीच्या (CID) दलातील पोलीस सुद्धा मदतीसाठी पुढे येणार आहेत.

राज्यात लॉकडाउनच्या काळात नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळाची अधिक गरज आहे. तर कोरोना व्हायरस दिवसेंदिवस राज्यात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लवकरात लवकर प्रतिबंधात्मक उपयायोजना करणे अत्यावश्यक आहे. सध्या पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांसमवेत अन्य पोलीस कर्मचारी कमी पडत आहेत. त्यामुळेच आता अधिक पोलिसांचे मनुष्यबळाची मदत घेतली जाणार आहे. जवळजवळ 2.20 लाख कर्मचारी महाराष्ट्रात पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यापैकी 10 टक्के कर्मचारी हे सीआयडी, एसीबी आणि पीसीआर येथे आपले कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाउनचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण पोलीस दलातील कर्मचारी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी पुढे आले आहेत.(COVID19: कोरोनाशी लढण्यासाठी 1.25 लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती)

दरम्यान, कोरोनाबाधितांवर उपचार डॉक्टर्स, नर्स आणि अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणारे कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. तसेच रस्त्यांवर पोलीस गस्त घालून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन करत आहेत. तरीही कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असून महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 26 रुग्ण आढळून आल्याने आकडा 661 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.