नागपूर येथे सकाळच्या वेळेस भाजी खरेदी करताना नागरिकांकडून सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा
तरीही नागपूर (Nagpur) येथे सकाळच्या वेळेस भाजी करताना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी करत सोशल डिस्टंन्सिंगचा (Social Destincing) फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. मात्र दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचे नियम अधिक कठोर पद्धतीचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु यापूर्वीसारेखच जीवनावश्यक गोष्टीसंदर्भातील सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन वारंवार करण्यात आले आहे. तरीही नागपूर (Nagpur) येथे सकाळच्या वेळेस भाजी करताना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी करत सोशल डिस्टंन्सिंगचा (Social Distancing ) फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना गरज असल्यास घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. मात्र विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. तसेच सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे सुद्धा अत्यावश्यक आहे. पण नागपूरात त्याचा फज्जा उडाल्याचे सकाळच्या वेळी दिसून आले आहे. नागपूरात एकूण 72 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तरीही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येत आहे.(नागपूर: Coronavirus Lockdown दरम्यान नागरिकांमध्ये जागतिक आरोग्य संकटाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी उभारला कोरोनाचा प्रतिकात्मक पुतळा)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तरीही राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. ऐवढेच नाही तर कामगार वर्गाला लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने त्यांची सुद्धा सोय सरकारकडून करण्यात आली आहे. येत्या 20 एप्रिल पासून कोरोनाच्या नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी नियम शिथिल करुन काही गोष्टी सुरु करण्यात येणार असल्याचा निर्णय ही सरकारने घेतला आहे.