Coronavirus: राज्यातील 4 लाखांहून अधिक स्थलांतरित कामगारांसाठी सरकारकडून 4653 रिलिफ कॅम्प शेल्टर्सची सोय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील 4 लाखांहून अधिक स्थलांतरित कामगारांसाठी जवजवळ 4653 रिलिफ कॅम्प शेल्टर्सची सोय करुन दिली असल्याची माहिती दिली आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकराने लॉकडाउनचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मात्र लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या घरची वाट पकडली आहे. बहुसंख्येने कामगार वर्ग प्रवासासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने पायी जात आहेत. पण राज्यसरकारने स्थलांतर करणाऱ्या कामगार वर्गाला राज्य सोडू जाऊ नका असे आवाहन केले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील 4 लाखांहून अधिक स्थलांतरित कामगारांसाठी जवजवळ 4653 रिलिफ कॅम्प शेल्टर्सची सोय करुन दिली असल्याची माहिती दिली आहे.
राज्यातील गरजूंना विविध स्तरातून मदत केली जात आहे. या गरजूंना स्थानिक नागरिकांकडून अन्नधान्याची सोय करुन दिली जात आहे. तर राज्य सरकारसुद्धा गरजू आणि कामगार वर्गासाठी त्यांच्या राहण्यापिण्याची सोय करुन देत आहे. आतापर्यंत राज्य सरकारने 4653 रिलिफ कॅम्प शेल्टर्सची सोय करुन दिली आहे. त्याचसोबत राज्यातील 5,53,025 कामगार आणि बेघर लोकांसाठी जेवणाची सोय करुन दिली जात आहे.(Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाजवळील चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण)
दरम्यान, लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 हजाराहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 7570 वाहने जप्त करण्यात आली असून 65,43,624 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला 49,708 जणांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्याने क्वारंटाइन करण्यात आले आहे. कलम 188 अंतर्गत 23,126 गुन्हे आणि 4,47,050 स्थलांतरित कामगारांना 4532 कॅम्पमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे