Coronavirus: महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना पदावर 3 महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याचे वृत्त

अशात महत्त्वाच्या पदावर नवा व्यक्ती आल्यास त्याला सर्व प्रक्रिया समजून घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यास काही काळ जातो. मात्र, सध्याचा ऐन धामधुमीचा काळ विचारात घेता सरकारने त्यांना पदावर कायम ठेवल्याचे समजते.

Maharashtra Chief Secretary Ajoy Mehta | (file image)

महाराष्ट्र मुख्य सचिव अजोय मेहता (Maharashtra Chief Secretary Ajoy Mehta) यांना त्याच पदावर तीन महिन्यांची मुदतावढ दिल्याचे वृत्त आहे. राज्यावर असलेला कोराना व्हायरस (COVID-19) संकटाचे सावट विचारात घेऊन त्यांचा पदावरील कालावधी वाढविण्यात आल्याचे समजते. देशभरात असलेल्या कोराना बाधित रुग्णांच्या संख्येचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना व्हायरस बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा फैलाव वाढू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न आहे. अशात महत्त्वाच्या पदावर नवा व्यक्ती आल्यास त्याला सर्व प्रक्रिया समजून घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यास काही काळ जातो. मात्र, सध्याचा ऐन धामधुमीचा काळ विचारात घेता सरकारने त्यांना पदावर कायम ठेवल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार अजोय मेहता हे एक कुशल प्रशासकीय अधिकारी आहेत. राज्यावर महाविकासआघाडीच्या रुपात तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आहे. तरीही अजोय मेहेता हे मुख्य सचिव म्हणून तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधून आवश्यक त्या सर्व उपाययोजना अमलात आण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, मेहता यांचा कार्यकाळही संपत आला आहे. एकाच पदावर एकाच व्यक्तीला वारंवार मुदतवाढ देणे हे कायद्याला धरुण नाही. त्यामुळे मेहता हे लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा असतानाच त्यांना मुदतवाढ मिळाली आहे. (हेही वाचा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही गैरसोय होत असल्यास 'या' क्रमांकावर साधा संपर्क; ठाणे पोलिसांकडून नागरिकांना दिलासा)

ट्विट

ट्विट

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची एकूण संख्या 873 इतकी आहे. त्यातील 79 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत 775 रुग्णांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज कोरोना व्हायरस बाधित नवे 6 रुग्ण आढळले. त्यातील 5 मुंबई शहरातील आहेत तर, एक नागपूर येथील आहे. नव्या रुग्णांची भर पडल्यानंर राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 159 इतकी झाली आहे.