महाराष्ट्रात आज आणखी 440 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आकडा 8068 वर पोहचला, आरोग्य विभागाची माहिती

त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 8068 वर पोहचला तर 342 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेत्या संबंधित निर्णयाचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे.

Coronavirus (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात (Maharashtra)  कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. येत्या 3 मे पर्यंत राज्यात लॉकडाउन कायम राहणार असल्याचा निर्णय आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शनिवारी जाहीर केला आहे. मात्र 3 मे नंतर राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउन संदर्भात निर्णय जाहीर केला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. राज्यात आज नव्या 440 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून 19 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 8068 वर पोहचला तर 342 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेत्या संबंधित निर्णयाचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे.

राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तर मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांवर दिवसरात्र वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपाचार केले जात असले तरीही आकडेवारी वाढत चालली आहे. तर आता राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजारांच्या पार गेला आहे. त्यापैकी 112 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत एकूण 1188 जणांची प्रकृती सुधारुन घरी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.(मुंबईची दुसरी लाईफ लाईन आता रुग्ण सेवेसाठी धावणार; बेस्टच्या ताफ्यातील एकूण 20 एसी बसचे रुपांतर रुग्णवाहिकेत)

दरम्यान, कोरोनाच्या नॉन- हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाउनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र कन्टेंटमेंट झोन आणि कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचे कठोर पालन केले जात आहेत. त्याचसोबत मुंबईतील दाटीवाटीच्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.