राज्यातील ऊसतोड कामगारांना स्वगृही परतण्याचा मार्ग खुला, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
तसेच सरकारने लॉकडाउनचे आदेश दिल्याने बहुसंख्येने कामगारांचे हाल झाले आहेत. त्यामुळे कामगारांनी आपल्या घरी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढली आहे. तसेच सरकारने लॉकडाउनचे आदेश दिल्याने बहुसंख्येने कामगारांचे हाल झाले आहेत. त्यामुळे कामगारांनी आपल्या घरी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारने कामगार वर्गाला राज्यातच थांबण्याचे आवाहन केले असून त्यांच्या खाण्यापिण्या पासून ते वैद्यकिय सेवांची सोय करुन दिली आहे. याच पार्श्वभुमीवर आता राज्यभरातील ऊसतोड कामगारांना दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार लॉकडाउनमुळे घरापासून दूर अडकलेल्या ऊसतोड कागारांसाठी स्वगृही परतण्यासाठी मार्ग खुला करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, ऊसतोड कामगार तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा.(Coronavirus: पुणे ते परभणी तब्बल 350 किमी पायी चालत गेलेल्या व्यक्तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजाराच्या पार गेला आहे. तर मुंबई आणि पुणे येथे सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. एकूणच कोरोनाची परिस्थिती पाहता केंद्र सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र 20 एप्रिल नंतर काही क्षेत्रात काही गोष्टी सुरु होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.