Lockdown: रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा निशाणा म्हणाले, 'राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका'

यातील एका ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील कामगारांची यादी द्या हव्या तेवढ्या ट्रेन पाठवतो. नाहीतर पाठवलेल्या ट्रेन परत रिकाम्या पाठवू नका, असे म्हटले. त्यानंतर संजय राऊत यांनी गोयल यांना टोला लगावला आहे.

Sanjay Raut Piyush Goyal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरना व्हायरस (Coronavirus), लॉकडाऊन (Lockdown) काळात स्थलांतरीत मजुारांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यावरुन सुरु झालेले राजकारण आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनी मजूरांची यादी पाठवायला सांगितली होती. त्यावरुन निशाणा साधत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी 14 मे 2020 या दिवशी सुटलेल्या नागपुर - ऊधमपुर ट्रेन साठी कोठली यादी घेतली होती?, असा सवाल विचारत 'राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका', असा टोलाही लगावला आहे.

महाराष्ट्रात सत्तेवर असलेले महाविकासआघाडी सरकार हे कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात ठेवण्यासाठी अपयशी ठरले आहे, असा आरोप विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्यासोबतच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 'मेरा आंगन मेरा रणांगन' असे आंदोलनही केले. या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विविध प्रश्नांची उत्तरे देत वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, आम्हाला कोणत्यीही गोष्टीचे राजकारण करायचे नाही. केंद्र सरकार मदत करत आहे. मात्र, काही गोष्टीं अद्याप मिळत नाहीत. यात जीएसटीचे पैसे, रेल्वे अशा गोष्टींचा समावेश आहे. मग त्याबाबत काय राज्यसरकारने बोंब मारायची काय?, असा टोला लगावला. (हेही वाचा, Lockdown: 527 ट्रेनने 7 लाख 38 हजार परप्रांतीय कामगार मूळ राज्यात परतले; पाहा मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, नागपूर शहरांतून किती सुटल्या विशेष श्रमिक ट्रेन)

संजय राऊत ट्विट

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटमागे ट्विट करण्याचा सपाटा लावाल. यातील एका ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील कामगारांची यादी द्या हव्या तेवढ्या ट्रेन पाठवतो. नाहीतर पाठवलेल्या ट्रेन परत रिकाम्या पाठवू नका, असे म्हटले. त्यानंतर संजय राऊत यांनी गोयल यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पियुषजी 14 मे 2020 ला सुटलेल्या नागपुर - ऊधमपुर ट्रेन साठी कोठली यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल? आता म यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका.