Coronavirus Lockdown चं बंधन पाळत नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी बाहेर पडा: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
थॅलिसेमिया सारख्या आजाराच्या रूग्णांना रक्ताची गरज असलेल्यांना रक्ताच्या तुटवड्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ नये या भीतीपोटी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संचारबंदीचं बंधन पाळत रक्तदान करण्यासाठी बाहेर पडा असं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र राज्यात वाढता कोरोनाबाधितांचा आकडा राज्यातील नागरिकांची चिंता वाढवणारा आहे. मात्र आता नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात स्वयंशशिस्त पाळत सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं पुन्हा आवाहन करत राज्यातील डॉक्टरांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी त्यांचे दवाखाने, क्लिनिक खुले ठेवण्याचं आवाहन केले आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने संचारबंदीच्या काळात अनेकजण घरामध्ये आहेत. परिणामी राज्यातील अनेक हॉस्पिटल्समध्ये रक्ताचा तुटवडा जाणवण्याची भीती आहे. थॅलिसेमिया सारख्या आजाराच्या रूग्णांना रक्ताची गरज असलेल्यांना रक्ताच्या तुटवड्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ नये या भीतीपोटी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संचारबंदीचं बंधन पाळत रक्तदान करण्यासाठी बाहेर पडा असं आवाहन केलं आहे. रक्तदान करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्या असेही ते म्हणाले आहेत. सोबतच नागरिकांना जागतिक आरोग्य संकट कोव्हिड 19 चा सामना करण्यासाठी सरकार काय पावलं आहेत याचीदेखील माहिती आहे.
आता 'ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट' या त्रिसुत्रीने सरकार कोरोना व्हायरसचा सामना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याला नागरिकांनीही साथ द्यावी. आंतरराष्ट्रीय आणि देशांर्तगत वाहतूक पूर्ण बंद असल्याने आता केवळ मागील काही दिवसांमध्ये परदेश प्रवास केलेल्या नागरिकांमधून त्यांच्या निकवर्तीयांमध्ये हा व्हायरस पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवस सोशल डिस्टंसिंग पाळा, संसर्ग पसरण्यापासून स्वतःला आणि तुमच्या कुटुंबीयांना दूर ठेवा असं कळकळीचं आवाहन पुन्हा राजेश टोपे यांनी केलं आहे. Video: टीम इंडियाचा फलंदाज केदार जाधव याने वाढदिवसादिनी रक्तदान करत जिंकली मनं, नागरिकांनाही केले पुढे येण्याचे आवाहन.
गरोदर महिला, हृद्यविकाराचे रूग्ण, लहान मुलांचे आजार अशा रूग्णांना लॉकडाऊनच्या काळात उपचाराअभावी कोणतेही आरोग्य संकट येणार नाही याची काळजी डॉक्टरांनी घ्यावी असेदेखील राजेश टोपे म्हणाले आहेत. माणुसकीचा धर्म पाळत एकमेकांना मदत करा. पोलिसांनी देखील डॉक्टरांना बाहेर पडण्यास मदत करावी, ओळखपत्र पाहिल्याशिवाय त्यांना रोखू नका असेही ते म्हणाले आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी सरकार कटिबद्ध आहे मात्र नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणं गरजेचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे 135 रूग्ण आहेत. त्यांच्यावर सरकारी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान कोरोना बरा होऊ शकतो. त्यामुळे 14 दिवसांचा क्वारंटाईनचा काळ संपल्यानंतर आता रूग्णालयातून सुट्टी देऊन घरी जाणार्यांचंही प्रमण वाढेल असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. आज पुणे जिल्ह्यातून 32 कोरोनाबाधितांपैकी 10 जणांची सुटका झाली आहे.