Coronavirus Lockdown: मुंबईत काम करणाऱ्या 5 जणांचा ऑटोरिक्षाच्या माध्यमातून बिहारकडे प्रवास

त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस राज्यात कायम राहू शकतात. तसेच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांना याचा फटका बसला आहे.

स्थलांतरित कामगार (Photo Credits-ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस राज्यात कायम राहू शकतात. तसेच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांना याचा फटका बसला आहे. या स्थलांतरित कामगारांना गेल्या दोन महिन्यात कोणतेच उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांनी आपल्या घरची वाट पकडली आहे. काही जण चालत आपल्या गावाकडे परतत आहे. परंतु सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन आणि बससची सोय करुन दिली आहे. परंतु ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक यांनी त्याच्या माध्यमातून आपल्या घरी जाण्यासाठी मार्ग शोधून काढला आहे. याच दरम्यान,मुंबईत काम करणाऱ्या 5 जणांनी सुद्धा ऑटो रिक्षाच्या माध्यमातून बिहारकडे प्रवास करण्यास आगेकुच केली आहे.

बिहारकडे जाण्यासाठी निघालेला धनंजय कुमार याने असे म्हटले आहे की, तो फुड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह आहे. आम्ही 2 महिने वाट पाहिली पण आम्हाला कळले की नितिश कुमार काहीच करत नाही आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या गावची वाट पकडली आहे. याआधी सुद्धा मोठ्या संख्येने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी एक्सप्रेस मार्गावर आपल्या गावाकडे जाण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले होते. परंतु परवाना धारक चालकांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.(Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 1602 नविन कोरोनाबाधितांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 27,524 वर; मुंबईमध्ये 16579 संक्रमित रुग्ण)

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात अडकून पडलेल्या प्रवासी, कामगार आणि मजूर वर्गांसाठी स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत. तर आता पर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक जणांचा या सुविधेचा लाभ घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता नागरिकांना लॉकडाउनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनची घोषणा केली आहे. परंतु चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये कोणत्या गोष्टींना सुट दिली जाणार आणि नाही याबाबत 18 मे पूर्वी स्पष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्व नागरिकांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif